सौर कृषीपंपांच्या मागणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 08:21 PM2017-08-08T20:21:40+5:302017-08-08T20:22:29+5:30
वाशिम: अपारंपरिक उर्जास्त्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर आहे. त्यामुळे राज्य शासनाने सौर कृषीपंप देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शेतकºयांना ३.५ ते ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी वाशिम जिल्ह्यास सद्यस्थितीत ८६५ सौर कृषीपंपांचे उद्दिष्ट असून, यामध्ये डीसी पंपांसाठी असलेल्या ४०० पंपांसाठी ४२३ शेतकºयांनी, तर एसी पंपांच्या ४६५ पंपांसाठी ३२० शेतकºयांनी अर्ज करून १५८ शेतकºयांनी पैसे भरले आहेत. डीसी पंपांची क्षमता अधिक असल्यामुळे या प्रकाराकडे शेतकºयांचा अधिक असल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अपारंपरिक उर्जास्त्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर आहे. त्यामुळे राज्य शासनाने सौर कृषीपंप देण्याची योजना जाहीर केली आहे. पूर्वीच्या अटी शिथील करण्यात आल्यानंतर या योजनेकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. या योजनेत डीसी पंपांसाठी ९०० शेतकºयांना विज वितरणने कोटेशन दिले होते. त्यामधील ४२३ शेतकºयांनी आपल्या हिश्शाची ५ टक्के रक्कम विज वितरणकडे भरली असून, यातील ३३७ शेतकºयांच्या शेतात सौरकृषीपंपही बसविण्यात आले आहेत. तथापि, या प्रकारातील पंपांचे उद्दिष्ट केवळ ४०० असताना ४२३ अर्ज आल्यामुळे विज वितरणच्या जिल्हा कार्यालयाकडून अतिरिक्त २५ पंपांना मंजुरी देण्याची मागणी वरिष्ठांकडे नोंदविण्यात आली आहे. त्याशिवाय एसी पंपांचे उद्दिष्ट असताना यासाठी ३२० शेतकºयांनी अर्ज सादर केले. त्यामधील १५८ शेतकºयांनी आपल्या हिश्शाची रक्कम भरल्यानंतर आतापर्यंत १०० शेतकºयांच्या शेतात विविध क्षमतेचे १०० पंप बसविण्यात आले. आता डीसी पंपांचे उद्दिष्ट कमी असल्याने शेतकºयांकडून एसी पंपांची मागणी करण्यात येत आहे. तशा स्वरूपातील शेकडो अर्ज विज वितरणकडे सादर करण्यात आले आहेत.