वाढत्या भारनियमनामुळे लघुव्यवसाय सापडले संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:12 PM2017-10-03T20:12:59+5:302017-10-03T20:14:36+5:30

वाशिम : यावर्षी पर्जन्यमानात प्रचंड घट होण्यासोबतच उन्हाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालल्याने विजेची मागणी देखील वाढली आहे. परिणामी, होणारी तूट भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये सद्या महावितरणच्या वतीने विजेचे भारनियमन केले जात आहे. यामुळे मात्र उकाड्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले असून तासन्तास विजपुरवठा खंडित राहत असल्याने लघुव्यवसायही संकटात सापडले आहेत.

Increasing weightlifting caused small business to the crisis! | वाढत्या भारनियमनामुळे लघुव्यवसाय सापडले संकटात!

वाढत्या भारनियमनामुळे लघुव्यवसाय सापडले संकटात!

Next
ठळक मुद्दे विजेची मागणी वाढली तूट भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये भारनियमनभारनियमनाचा फटका लघुव्यावसायिकांना

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यावर्षी पर्जन्यमानात प्रचंड घट होण्यासोबतच उन्हाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालल्याने विजेची मागणी देखील वाढली आहे. परिणामी, होणारी तूट भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये सद्या महावितरणच्या वतीने विजेचे भारनियमन केले जात आहे. यामुळे मात्र उकाड्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले असून तासन्तास विजपुरवठा खंडित राहत असल्याने लघुव्यवसायही संकटात सापडले आहेत.
सद्य:स्थितीत ‘इमरजेंसी लोडशेडींग’च्या नावाखाली जिल्ह्यातील शहरी भागात सुमारे ८ ते १० तासांचे भारनियमन केले जात असून ग्रामीण भागात १२ ते १४ तास विजपुरवठा खंडित ठेवला जात आहे. यामुळे विजेवर चालणाºया पिठाच्या गिरण्या, सुतारकाम, लोहारकाम, विद्यूत उपकरणे दुरूस्तीची दुकाने यासह इतरही लघुव्यवसायांवर मोठा परिणाम झाला असून शेकडो लोकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. 

Web Title: Increasing weightlifting caused small business to the crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.