कोविड केअर सेंटरच्या मागणीसाठी पदाधिकारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:42 AM2021-04-27T04:42:33+5:302021-04-27T04:42:33+5:30
दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातच रुग्णांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. काही सौम्य लक्षणे ...
दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातच रुग्णांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. काही सौम्य लक्षणे दिसली तर रुग्ण घाबरून शहराकडे जाण्याकरिता धजावत नाहीत. त्यामुळे रुग्णांची व खेड्यांची परिस्थिती बघता ग्रामीण भागातील मानसिकता बघता त्यांना वातावरण अनुकूल होईल याकरिता ग्रामीण भागातच कोविड सेंटर सुरू करण्यात यावे जेणेकरून भौगोलिक परिस्थिती बघता व रुग्णांना मानसिक आधार मिळेल या दृष्टीने बघता ग्रामीण भागातील मेडशी येथे आरोग्यवर्धिनी केंद्रात ऑक्सिजनयुक्त व व्हेंटिलेटरयुक्त कोविड सेंटर सुरू करण्याकरिता जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी तायडे व सरपंच शेख जमीर शेख गनीभाई यांनी पुढाकार घेतला आहे. तशी मागणी सरपंच शेख जमीर यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष बोरसे यांच्याकडेसुद्धा केली आहे. आमदार अमित झनक यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली असून कोविड सेंटर सुरू करण्याकरिता पाठवापुरावा करून कोविड सेंटर आणू, असा शब्दसुद्धा सरपंच व जिल्हा परिषद सदस्य यांना त्यांनी दिला असल्याची माहिती सरपंच शेख जमीर यांनी दिली.