जलसंधारणाच्या कामांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 03:55 PM2019-02-01T15:55:31+5:302019-02-01T15:56:07+5:30
वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान अभियान राबविले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान अभियान राबविले जात आहे. कामाअभावी जेसीबी व पोकलन मशिन जागेवरच उभ्या राहू नये म्हणून या मशीनकरिता स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
टंचाईग्रस्त भागात जलसंधारणाची विविध कामे करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) केला जात आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत कारंजा, वाशिम, मालेगाव, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात जलसंधारणाची विविध कामे सुरू आहेत. जलसंधारणाच्या कामांसाठी बीजेएसने २८ जेसीबी व १३ पोकलन मशीन मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. काही ठिकाणी कामांअभावी तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे जेसीबी व पोकलन मशिन जागेवरच उभ्या आहेत. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी जेसीबी व पोकलन मशीनकरिता संबधित विभागाने स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिलेले आहेत. सदर मशीन कामाअभावी अथवा इंधनअभावी बंद राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित नोडल अधिकाºयांवर निश्चित केली जाणार आहे. बीजेएसमार्फत सुरू असलेल्या कामावर प्रत्येक मशीनमागे एक नोडल अधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्याअनुषंगाने कृषी विभाग, मृद व जलसंधारण विभाग, जि.प. लघु सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, जि.प. बांधकाम विभाग, वनविभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यासह सहा तालुका कृषी अधिकारी आदींशी जिल्हा प्रशासनाने पत्रव्यवहार केला असून, कामाचे नाव व मशिनच्या क्रमांकासह नोडल अधिकाºयांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सदरचे काम मोजमापाअभावी, इंधनाअभावी बंद राहिल्यास त्याकरीता संबंधित नोडल अधिकाºयांना जबाबदार धरले जाणार आहे.