भारतीयांनी अमेरिकेत साजरी केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 06:27 PM2020-03-09T18:27:38+5:302020-03-09T18:27:49+5:30

अटलांटा येथील राम मंदिरात होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Indians celebrate Holi in America | भारतीयांनी अमेरिकेत साजरी केली होळी

भारतीयांनी अमेरिकेत साजरी केली होळी

Next

शेलूबाजार: भारतीचा  संस्कृतीचा  वारसा  अनेक सनांच्या निमीत्ताने आपन सर्वांनी वर्षानूवर्ष जपला आहे त्याच प्रमाणे अनेक कारणांच्या निमीत्ताने विदेशात गेलेल्या भारतीयांनी अगदी आजही कायम जपला आहे.याचेच उदाहरण म्हणजे होळी उत्सव आपल्या कडे साजरा केला जात असताना तो अमेरीकेतही उत्साहात साजरा केला असल्याची माहिती शेलूबाजार येथील नितीन शालीग्राम घोडे यांनी अमेरीकेतून दिली आहे.
          भारतीय संस्कृतीला अनेक सनांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा लाभला आहे .त्यात भारतातील अनेक भाषा , अनेक जाती,समुदाय, वेगवेगळ्या परंपरांचा वारसा पुरातन काळापासून चालत आलेला आहे . भारतात सनांच्या माध्यमातून जो सांस्कृतिक वारसा जपला जातो तो आजही भारतीयांनी विदेशात त्याचप्रमाणे जपला आहे.शेलूबाजार येथील रहिवासी व नौकरीच्या निमीत्ताने अमेरीकेतील अटलांटा शहरात परीवारासह वास्तव्यास असलेले नितीन घोडे हे तेथील भारतीयांच्या उत्सवात सहभागी होतात .होळीच्या निमित्ताने अटलांटा येथील राम मंदिरात होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तेथे रहीवाशी असलेल्या असंख्य भारतीयांनी राममंदिर परीसरात उपस्थित राहून विधीवत पूजाअर्चा करून होळीचे दहन केले.

Web Title: Indians celebrate Holi in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.