वाशिम जिल्ह्यात स्वच्छ वॉर्ड स्पर्धेबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:17 AM2018-02-08T01:17:56+5:302018-02-08T01:18:13+5:30

वाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात स्वच्छता अभियानातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून नागरी भागांत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम पालिका वगळता इतर ठिकाणी स्वच्छतेबाबत फारशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. 

Indifference to clean ward competition in Washim district | वाशिम जिल्ह्यात स्वच्छ वॉर्ड स्पर्धेबाबत उदासीनता

वाशिम जिल्ह्यात स्वच्छ वॉर्ड स्पर्धेबाबत उदासीनता

Next
ठळक मुद्देपदाधिकार्‍यांसह, प्रशासनाच्या सक्रियतेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात स्वच्छता अभियानातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून नागरी भागांत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम पालिका वगळता इतर ठिकाणी स्वच्छतेबाबत फारशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. 
राज्याचा संपूर्ण नागरी भाग हागणदरीमूक्त झाल्याची घोषणा १ ऑक्टोबर २0१७ रोजी करण्यात आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापनांतर्गत १ मे २0१७ पासून राज्यातील प्रत्येक शहरात ‘कचरा लाख मोलाचा’ या अंतर्गत ओल्या आणि सुक्या कचर्‍याचे विलगीकरण करून या कचर्‍यावर केंद्रित अथवा विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया करण्याबाबत सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सुचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभागी होण्यास लोकांना प्रेरित करून हागणदरीमुक्ती आणि स्वच्छतेबाबत शहरांची कायमस्वरूपी क्षमता वाढविण्यासाठी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १ जानेवारीपासून या स्पर्धेला सुरूवात झाली असून, सर्वच शहरातील प्रत्येक वार्ड या स्पर्धेत सहभागी होणेही बंधनकारक होते. अर्थात वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक नागरी स्वराज्य संस्थेतील वार्डांचा यात सहभाग असेल; परंतु या स्पर्धेतंर्गत वार्डात आवश्यक असलेले उपक्रम मात्र राबविण्यात येत असल्याचे दिसत नाही. यामध्ये प्रत्येक घरातून संकलित केलेल्या कचर्‍यातील ओल्या कचर्‍यावर वार्डातच विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया करणे, वार्डात नेहमी कचरा दिसणार्‍या ठिकाणांचे सुशोभीकरण करणे, नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जनजागृतीचे कार्यक्र म स्वत:च्या वार्डात घेणे, वार्डात प्लास्टिक बंदी राबविण आदि मुद्यांवर विशेष लक्ष देण्यात येत नसल्याने या स्पर्धेमागील शासनाचा उद्देश मात्र असफल ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना या स्पर्धेतंर्गत नमूद निर्देशानुसार कार्यक्रम राबवून प्रत्येक वार्डाची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करून २५ मार्च २0१८ पर्यंत शासनाला अहवाल पाठवावा लागणार आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या दिवसांत या स्पर्धेत जिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कशी कामगिरी करतात. ते पाहणे महत्त्वाचे आहे. 

वाशिम शहरात स्वच्छतेचे वारे
स्वच्छ महाराष्ट्र  अभियानांतर्गत वाशिम शहरामध्ये स्वच्छतेचे वारे वाहतांना दिसून येत आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे रात्रंदिवस मेहनत घेवून शहराला स्वच्छतेकडे नेतांना दिसून येत आहेत. या कार्यास नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासह सर्वच पदाधिकार्‍यांचे व कर्मचार्‍यांचे त्यांना सहकार्य लाभतांना दिसून येत आहे. त्या पाठोपाठ कारंजा येथे काही प्रमाणात कार्य होतांना दिसून येत आहे. वाशिम शहरामध्ये रात्री सफाई कामगारांकडून शहर स्वच्छ केल्या जात आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक व अनेक ठिकाणी स्वच्छता पाळण्यासंदर्भात फलक लावण्यात आले आहे.

Web Title: Indifference to clean ward competition in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.