पोकरा समिती गठित करण्याबाबत उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:26 AM2021-07-12T04:26:04+5:302021-07-12T04:26:04+5:30
नवीन ग्रामपंचायत सदस्य पदावर आरूढ झाल्यानंतर नियमानुसार पूर्वीची ‘पोकरा’ (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) समिती बरखास्त करण्यात आली. नवी ...
नवीन ग्रामपंचायत सदस्य पदावर आरूढ झाल्यानंतर नियमानुसार पूर्वीची ‘पोकरा’ (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) समिती बरखास्त करण्यात आली. नवी समिती गठित करण्याकडे सरपंचांनी दुर्लक्ष केले. यामुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेंतर्गत ड्रीप, स्प्रिंकलर, शेडनेट हाऊस आदींसाठी पूर्वसंमती पत्र मिळणे कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी जुनी देयके यामुळे प्रलंबित आहेत. त्यामुळे समिती तात्काळ गठित करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी लावून धरली. यासंबंधी ग्रामसचिवांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र लिहून सरपंचांना पोकरा समिती गठित करण्याबाबत तारीख मागितली असता त्यांनी लोकांना ऑनलाइन ग्रामसभा समजत नाही, लोकांकडे मोबाइल नाही, नेटवर्क नाही, अशी कारणे देऊन टाळाटाळ केली, असे नमूद केले. दरम्यान, हा गोंधळ विनाविलंब संपुष्टात आणून पोकरा समिती गठित करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांसह शेतकऱ्यांमधून होत आहे.
....................
कोट :
लोणीच्या सरपंचांना ऑनलाइन सभा घेण्याबाबत वारंवार वेळ मागितला. मात्र, अद्याप सभा होऊ शकली नाही. त्यामुळेच पोकरा समिती गठित करण्याबाबत मान्यता मिळाली नाही. गटविकास अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून अवगत करण्यात आले आहे.
- प्रल्हादराव घुगे
ग्रामसचिव, लोणी बु.