वाशिम जिल्ह्यात औद्योगिक इंधनाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2022 04:49 PM2022-02-06T16:49:15+5:302022-02-06T16:49:22+5:30

Industrial fuel stocks seized in Washim district : एका टिनशेडमध्ये औद्योगिक इंधन, वाहन असा १५.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

Industrial fuel stocks seized in Washim district | वाशिम जिल्ह्यात औद्योगिक इंधनाचा साठा जप्त

वाशिम जिल्ह्यात औद्योगिक इंधनाचा साठा जप्त

googlenewsNext

वाशिम : बायो डिझेलच्या नावाने औद्योगिक इंधनाची विक्री (इंडस्ट्रियल आॅईल) करण्याचा गोरखधंदा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ फेब्रुवारी रोजी वाशिम ते केकतउमरा या मार्गावरील गोटे महाविद्यालयासमोरील एका टिनशेडमध्ये औद्योगिक इंधन, वाहन असा १५.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा याकरीता जिल्ह्यात वेळोवेळी नाकाबंदी, कोम्बींगची मोहिम राबवून अवैध्य धंद्यांवर कारवाई, मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. बायो डिझेलच्या नावाने औद्योगिक इंधनाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिंह यांना मिळाल्याने, तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना खात्री करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, एका टिनशेडमध्ये एमएच२८ बीबी ४९३९ क्रमांकाच्या वाहनातून औदयोगिक इंधन या नावाने बायोडिझेल बेकायदेशीररित्या इलेक्ट्रीक पाण्याची मोटार व पाईप लावुन टिनशेडमधील प्लास्टीक टाकीमध्ये उतरवित असताना आढळून आले. घटनास्थळी नमुद ७ इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, त्यांच्याकडे औदयोगिक इंधन विक्री व साठवणुक करण्याबाबतचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. आरोपींकडुन अंदाजे सहा हजार लिटर औद्योगिक इंधनाचा साठा, एक टाटा वाहन व इतर साहित्य असा एकुण १५ लाख ९४ हजार २५० रुपयाचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त केला.
 
पुढील कारवाईसाठी तहसिलदारांना पत्र
औद्योगिक इंधनाचा साठा जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस विभागाने वाशिम तहसिलदार व पुरवठा निरिक्षक यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले.
 
यांनी बजावली कामगिरी
पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे, पोलीस उपनिरीक्षक पठाण यांच्यासह पोलीस कर्मचारी किशोर चिंचोळकर, राजेश गिरी, अमोल इंगोले, प्रशांत राजगुरु, संतोष शेणकुडे यांनी कारवाई केली.

Web Title: Industrial fuel stocks seized in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.