जीवंत स्त्री जातीचे अर्भक आढळले

By admin | Published: July 6, 2016 05:52 PM2016-07-06T17:52:03+5:302016-07-06T17:52:03+5:30

मालेगाव तालुक्यातील जामखेड ते हनवतखेडा या मार्गालगतच्या एका शेतात बुधवारी दुपारच्या सुमारास जीवंत स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले आहे.

The infant of the lively female breed was found | जीवंत स्त्री जातीचे अर्भक आढळले

जीवंत स्त्री जातीचे अर्भक आढळले

Next

ऑनलाइन लोकमत
जि.वाशिम, दि. ६ : मालेगाव तालुक्यातील जामखेड ते हनवतखेडा या मार्गालगतच्या एका शेतात बुधवारी दुपारच्या सुमारास जीवंत स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले आहे. या अर्भकाला वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
जामखेड ते हनवतखेडा या मार्गालगतच्या आत्माराम पोफळे यांच्या शेताच्या धुऱ्यावर लहान बाळ रडत असल्याचा आवाज आल्याने शेतातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्त्रि जातीचे अर्भक असल्याचे दिसून आले. जामखेडचे सरपंच मनासाराम भोंडणे यांनी याप्रकरणी जऊळका पोलिसांना माहिती दिली. तातडीने पोलिसांचा ताफा आरोग्य कर्मचाऱ्यांसह दाखल झाला. जऊळका प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ सदर अर्भक वाशिम जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. पोटच्या गोळ्याला बेवारस स्थितीत फेकून पोबारा करणाऱ्या अज्ञात निर्दयी मातेविरूद्ध जऊळका पोलीस स्टेशनला भादंवी कलम ३१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: The infant of the lively female breed was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.