सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:33+5:302021-07-12T04:25:33+5:30

आधी पावसाने दीर्घ विश्रांनी घेतल्याने खरीप पिके संकटात सापडली होती. आता गत दोन दिवसांतील पावसाने या पिकांना आधार मिळाला ...

Infestation of leaf-eating larvae on soybean crop | सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

Next

आधी पावसाने दीर्घ विश्रांनी घेतल्याने खरीप पिके संकटात सापडली होती. आता गत दोन दिवसांतील पावसाने या पिकांना आधार मिळाला असताना सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या किडीमुळे सोयाबीनच्या पानांची चाळणी होत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी दगड उमरासह फाळेगाव थेट, जांभरून जहागीर, बाभुळगाव आदि परिसरातील शिवारात सध्या शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करण्यावर जोर देत आहेत. तथापि, प्रभावी नियंत्रण होत नसल्याने उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली असून, कृषी विभागाने या संदर्भात मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

------------

उत्पादन घटण्याची भीती

सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पिकाच्या पानांची चाळणी होत असल्यामुळे पीक अडचणीत आले आहे. यावर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Infestation of leaf-eating larvae on soybean crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.