भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव
By admin | Published: September 5, 2015 01:39 AM2015-09-05T01:39:40+5:302015-09-05T01:39:40+5:30
पानकोबीवर ‘करपा’रोग आल्याने शेतकरी आर्थिक संकटात.
मंगरुळपीर (जि. वाशिम):संपूर्ण जिल्ह्यात खरीप पिके अपुर्या पावसामुळे धोक्यात आली आहे. त्यात भाजीपाल्यावर विविध प्रकारच्या रोगराईमुळे प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्याचे चित्न पहावयास मिळत आहे. गेल्या तीन वर्षांंंपासून जिल्ह्यातील शेतकर्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेला आहे, गेल्या वर्र्षी पावसाचे उशिरा आगमन झाल्याने व वर्षभर आलेल्या अवकाळी पावसाने फळबागा उद्ध्वस्त झाल्यात, त्यामुळे शेतकरीवर्ग निसर्गाच्या प्रकोपाने पार खचून गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने खरीप पिके गेल्यात जमा आहेत. अशा विविध संकटे पेलविणार्या बळीराजा आता भाजीपाल्यावर आलेल्या विविध नैसर्गिक रोगराईने आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. हिरंगी येथील नारायण सावके यांच्या दीड एकर कोबीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला. सदर प्लॉट करपा रोगामुळे व्यापार्यांनी अर्धीच किमतीत मागीतला. या रोगामुळे त्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागले. त्याच बरोबर वांग्यावर अळ्यांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहे. शिमला मिरचीवर व्हायरस आल्यामुळे बर्याच शेतकर्यांचे प्लॉट धोक्यात आली आहेत. शेलूबाजार भागात जवळपास ६0 एकर शिमला मिरचीची लागवड करण्यात आली आहे. सोयाबीन उत्पन्न गेले; मात्न भाजीपाल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई निघेल, अशी आशा शेतकर्यांना होती; मात्न निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी पार खचुन गेला आहे. तालुक्यातील ग्राम शेलुबाजार परिसरात कोबी पिकावर करपा रोगाच्या आक्रमणाने संपूर्ण पीक पिवळे पडत आहे.