महागाईच्या दिवसांमध्ये ‘काटकसर’ कठीणच!

By admin | Published: October 29, 2014 11:57 PM2014-10-29T23:57:45+5:302014-10-29T23:57:45+5:30

काटकसरदिन, काटकसर करता-करता नाकीनऊ

Inflation in the days of inflation is difficult! | महागाईच्या दिवसांमध्ये ‘काटकसर’ कठीणच!

महागाईच्या दिवसांमध्ये ‘काटकसर’ कठीणच!

Next

वाशिम : महागाईचा आलेख दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे नियोजनच कोलमडून टाकले आहे. भावी आयुष्याच्या सुरक्षिततेसाठी बचत आवश्यकच आहे; मात्र महागाईमुळे ह्यकाटकसरह्ण करणेही अवघड झाल्याच्या प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी व्यक्त केल्या. निमित्त होते ३0 ऑक्टोबरच्या काटकसर दिनाचे. काटकसर दिनानिमित्त वाशिम शहरातील सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूकदार, ग्राहक, गृहिणी यांचे सर्वेक्षण करण्यात आले. गत दोन-तीन वर्षांच्या तुलनेत आता महागाई प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. महागाई लक्षात घेता गुं तवणूक करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. आतापासून काटकसर केली तर भावी आयुष्या त फारशी आर्थिक अडचण जाणार नाही; मात्र महागाईमुळे दैनंदिन गरजा भागविणेही कठीण होऊ जात आहे. महागाईमुळे काटकसरीचे गणित बिघडत चालले आहे, असे ९0 टक्के जनतेला वाटते. आठ टक्के लोक मात्र काटकसरीवर महागाईचा परिणाम होत नसल्याच्या मताचे आहेत तर दोन टक्के नागरिकांना याबाबत काहीही सांगता येत नाही, असे सर्वेक्षणातून समोर आले. दिवसागणिक वाढणार्‍या महागाईला मात देण्यासाठी काटकसर महत्त्वाची भूमिका वठवू शकते, असे मत ७८ टक्के लोकांनी व्यक्त केले.

Web Title: Inflation in the days of inflation is difficult!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.