माहिती देण्यास टाळाटाळ, शिक्षणाधिकार्‍यांना पाच हजारांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:52 AM2017-10-07T01:52:45+5:302017-10-07T01:53:29+5:30

वाशिम: माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी वाशिम जि. प.चे तत्कालीन शिक्षणाधिकारी तथा जनमाहिती अधिकारी  दिनेश तरोळे, तसेच विद्यमान जनमाहिती अधिकारी रविन ठाकूर  यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात आली  आहे. या प्रकरणी वाशिम येथील महेश गंगाधर मानकर यांनी अ पील दाखल केल्यानंतर माहिती आयुक्त अमरावती यांनी हा  निर्णय २६ सप्टेंबर रोजी दिला. त्याची प्रत ३ ऑक्टोबर रोजी  प्राप्त झाली. 

Information about scams, educational rights to punish Rs 5,000! | माहिती देण्यास टाळाटाळ, शिक्षणाधिकार्‍यांना पाच हजारांचा दंड!

माहिती देण्यास टाळाटाळ, शिक्षणाधिकार्‍यांना पाच हजारांचा दंड!

Next
ठळक मुद्देमाहिती आयुक्तांचा निर्णयविद्यमान जनमाहिती अधिकार्‍यांनाही दंड

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी वाशिम जि. प.चे तत्कालीन शिक्षणाधिकारी तथा जनमाहिती अधिकारी  दिनेश तरोळे, तसेच विद्यमान जनमाहिती अधिकारी रविन ठाकूर  यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात आली  आहे. या प्रकरणी वाशिम येथील महेश गंगाधर मानकर यांनी अ पील दाखल केल्यानंतर माहिती आयुक्त अमरावती यांनी हा  निर्णय २६ सप्टेंबर रोजी दिला. त्याची प्रत ३ ऑक्टोबर रोजी  प्राप्त झाली. 
महेश गंगाधर मानकर यांनी माहिती अधिकारांतर्गत राणी  लक्ष्मीबाई शाळेतील मुख्याध्यापक पदाच्या अप्रुवलची नक्कल,  मुख्याध्यापक पदासाठीची सेवाज्येष्ठता यादी, लिपिक पदासाठी  आस्थापना मान्यता आणि आरक्षणाची माहिती, तसेच लिपिक  पदासाठी शैक्षणिक पात्रतेची माहिती राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा  वाशिमच्या मुख्याध्यापकाकडे मागितली होती. त्यांनी अर्धवट  माहिती दिली. त्यामुळे त्यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी जि.प.  वाशिम यांच्याकडे तक्रार करून माहिती मागितली. त्यावेळी  शिक्षणाधिकार्‍यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे मानकर यांनी  शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी  उपसंचालकांनी जि.प. शिक्षण अधिकार्‍यांना पत्र देऊन सुनावणी  घेण्यास मानकर यांनी  मागितलेली माहिती देण्यास सांगितले.  त्यानंतरही तत्कालीन शिक्षणाधिकार्‍यांनी सुनावणी घेतली नाही  आणि माहितीही दिली नाही. त्यामुळे मानकर यांनी माहिती  आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली. माहिती  आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन ४ ऑगस्ट २0१७ रोजी  सुनावणी ठेवली. यावेळी तत्कालीन शिक्षणाधिकारी तथा  जनमाहिती अधिकारी दिनेश तरोळे, तसेच विद्यमान जनमाहिती  अधिकारी रविन ठाकूर यांना या सुनावणीस बोलावले. तसेच त त्कालीन प्रथम अपिलीय अधिकारी व्ही. जी. लबडे आणि  विद्यमान प्रथम अपिलीय अधिकारी आर. डी. तुरणकर यांनाही  सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले होते; परंतु हे चारही  अधिकारी सदर सुनावणीस उपस्थित राहिले नाही.  त्यामुळे  माहिती आयुक्तांनी या प्रकरणी संबंधित तत्कालीन जनमाहिती  अधिकारी आणि विद्यमान जनमाहिती अधिकारी यांना या  प्रकरणी काहीही म्हणायचे नसल्याचे समजत त्या दोघांनाही प्र त्येकी पाच हजार रुपये दंड, तसेच तत्कालीन प्रथम अपिलीय  अधिकारी लबडे आणि विद्यमान प्रथम अपिलिय अधिकारी  आर. डी. तुरणकर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून  त्याचा अहवाल आयोगास सादर करण्याचे आदेश शिक्षण उ पसंचालक अमरावती यांना दिले. त्याशिवाय माहिती मागणारे  महेश मानकर यांना नुकसान भरपाई म्हणून ३ हजार रुपये  धनादेशाद्वारे अदा करण्याचे आदेशही दिले. 

Web Title: Information about scams, educational rights to punish Rs 5,000!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.