बुद्ध विहारांच्या समन्वयासाठी माहिती संकलनाची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:02 PM2017-10-26T16:02:57+5:302017-10-26T16:04:50+5:30
मालेगाव : राज्यातील गाव, शहर व हर-महानगरांतील लहान-मोठ्या सर्व बुद्ध विहारांचा समन्वय ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एक समयबद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार बुद्ध विहारांची माहिती संकलित केली जात आहे.
मालेगाव : राज्यातील गाव, शहर व हर-महानगरांतील लहान-मोठ्या सर्व बुद्ध विहारांचा समन्वय ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एक समयबद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार बुद्ध विहारांची माहिती संकलित केली जात आहे. वाशिम जिल्ह्यात नालंदा विहार वाशिमचे मिलिंद उके व धम्मस्थान स्तूप, मालेगावचे सुधाकर पखाले यांचेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सन २०१४ ते २०२० या सात वर्षाचे नियोजन करून नागपूरला एक बुद्ध विहार समन्वय समिती अस्थायी स्वरूपात गठन करण्यात आली. या समिती मार्फत मे २०१५, एप्रिल २०१६ आणि फेब्रुवारी २०१७ ला दरवर्षी नागपूरचे पूज्य भदंत विमलकिर्ती गुणसारी यांच्या मार्गदर्शनात जवळपास ४१६ विहारांच्या संचालक मंडळ प्रतिनिधीच्या परिषदा घेण्यात आल्या आहेत. येणाºया २०१८ या वर्षात जवळपास १०, ००० विहार प्रतिनिधींची परिषद घेण्याचा मानस या समन्वय समितीचा आहे. पुढे सन २०२० पर्यंत ही संख्या १०, ००० विहारांच्या समन्वयासाठी जनमत तयार करण्याचे व त्यातून बौद्धांच्या विविध संघटनांची शिखर संघटना ठरावी अशी बुद्ध विहार समन्वय समिती निर्माण करण्याचा मनोदय आहे. समितीतर्फे त्यांची माहिती आणि डिसेंबर २०१७ ला होत असलेल्या पाली भाषा परीक्षेची माहीती देण्यासाठी नुकतेच वाशिमच्या नालंदा नगर बुद्ध विहारात एक दिवसाचे शिबीर पार पडले. यावेळी या प्रकल्पाचे प्रवर्तक व आधार स्तंभ अशोक सरस्वती बोधी व शुद्धोधन बडवने (नागपूर) यांनी मार्गदर्शन केले.
वाशिम जिल्ह्यातील ज्या गावांत बुद्ध विहार अस्तित्वात आहेत, तेथील विहार कमेटीचे दोन क्रियाशील प्रतिनिधी सभासदांची माहिती एकत्र करण्याची जबाबदारी नालंदा विहार वाशिमचे मिलिंद उके व धम्मस्थान स्तूप, मालेगांवचे सुधाकर पखाले यांचेकडे सोपविण्यात आली आहे.
गावांगावांत कार्यरत असणाºया विहार पदाधिकाºयांच्या प्रतिनिधींनी संबंधितांशी संपर्क साधून एक मोफत फॉर्म लवकरात लवकर भरून जमा करण्याचे आवाहन सुधाकर पखाले, सुभाष खिल्लारे व सदधम्म प्रचार केंद्र यांनी केले आहे.