शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची माहिती पोर्टलवर 'अपलोड'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 03:12 PM2020-02-10T15:12:51+5:302020-02-10T15:13:02+5:30
१ लाख ५ हजार शेतकºयांच्या बँकांमधील कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील १ लाख ५ हजार शेतकºयांच्या बँकांमधील कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झाली असून, १० फेब्रुवारीपासून बँका आणि आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये बायोमेट्रीक पद्धतीने आधार पडताळणी केली जाणार असून ही प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.
सहकार विभागाच्या नियंत्रणाखाली जिल्हाभरात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी केली जात असून या योजनेसाठी राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँका निवडण्यात आल्या आहेत. १ फेब्रूवारी २०२० पासून स्वतंत्र ‘पोर्टल’ कार्यान्वित करून त्याव्दारे संबंधित बँकांना शेतकºयांची माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वाशिम जिल्ह्यात त्यापुर्वीच १ लाख ५ हजार शेतकºयांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारपासून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या याद्या संबंधित बँकांच्या शाखा फलकावर आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांच्या दर्शनी भागात लावल्या जाणार आहेत. सोबतच विविध बँका आणि आपले सरकार सेवा केंद्रांवर बायोमेट्रीक पद्धतीने कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या आधार क्रमांकाची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्रांना ७७८ बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी आपापल्या स्तरावर बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध केली आहेत.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकºयांना कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५ हजार शेतकºयांना २ लाखांपर्यंतच्या पिक कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यांच्या याद्या ठराविक पोर्टलवर अपलोड झाल्या असून आधार पडताळणी प्रक्रियेनंतर शासनाच्या पुढील आदेशावरून संबंधितांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. याअंतर्गत कामे गतीने पूर्ण केली जात आहेत.
- डॉ. दत्तात्रय निनावकर
व्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम