वाशिम बाजार समितीमध्ये हळदीची आवक सुरू; भाव साडे सात हजारावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 07:40 PM2018-01-21T19:40:45+5:302018-01-21T19:44:33+5:30
वाशिम : यंदाच्या हंगामातील हळदीची आवक बाजारात सुरू झाली असून, गतवर्षीपेक्षा यंदा या शेतमालास चांगले भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. सद्यस्थितीत हदीला जास्तीतजास्त ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या हंगामातील हळदीची आवक बाजारात सुरू झाली असून, गतवर्षीपेक्षा यंदा या शेतमालास चांगले भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. सद्यस्थितीत हदीला जास्तीतजास्त ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत. तथापि, बाजारात फारशी आवक होत नसून, शनिवारी वाशिम येथील बाजारात केवळ १५ क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती.
वाशिम जिल्ह्यात गतकाही वर्षांपासून हळदीच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. मसालावर्गीय या पिकाकडे दिवसेंदिवस जिल्ह्यातील शेतक-यांचा कल वाढत असून, यंदाच्या हंगामात जिल्ह्यात जवळपास हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली होती. गतवर्षीपेक्षा यंदा मात्र अल्पपावसामुळे हळदीचे क्षेत्र घटले आहे. आता काही ठिकाणी हळदीची काढणी सुरू झाली असून, शेतक-यांनी बाजारात हळदीची विक्री सुरू केली आहे. वाशिम येथील बाजारात हळद खरेदीला सुरुवातही करण्यात आली असून, या ठिकाणी जिल्ह्यातील विविध ठिकाणचे शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत. अद्याप ७५ टक्के क्षेत्रातील हळदीची काढणी शिल्लक आहे. जवळपास महिनाभरात हळदीची काढणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे महिनाभरानंतर हळदीची आवक वाढणार आहे.