पिवळ्या पळसाच्या संवर्धनासाठी बचाव पथकाच्या सदस्यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:42 AM2021-04-22T04:42:20+5:302021-04-22T04:42:20+5:30
पिवळ्या पळसाच्या संवर्धनासाठी पर्यावरण अभ्यासक गौरव कुमार इंगळे, प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे व प्रा. बापुराव डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ...
पिवळ्या पळसाच्या संवर्धनासाठी पर्यावरण अभ्यासक गौरव कुमार इंगळे, प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे व प्रा. बापुराव डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम वाशिम शाखा वनोजा व महाविद्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या सदस्यांनी परिसर पिंजून काढत पिवळा पळस जतन करण्याला सुरूवात केली. एक पिवळा पळस वाशिम जिल्ह्यातील वनोजा परिसरात आहे. वनोजा येथील पर्यावरण प्रेमी आदित्य इंगोले हे मागच्या वर्षीपासून बियांपासून रोपे निर्मिती करून पळसाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. यावर्षीदेखील रासेयोच्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम वाशिम शाखा वनोजा च्या सदस्यांनी या पळसाच्या परिपक्व हजारो बिया जमा केल्या. लवकरच वनविभागाच्या मदतीने व वेगवेगळ्या पद्धतीने या बियांपासून रोप निर्मिती करून त्या रोपांचे ठिकठिकाणी वितरण करणार आहेत.