गावांच्या आत्मनिर्भरतेसाठी होण्यासाठी मोडक स्मृती प्रकल्पाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:43 AM2021-07-27T04:43:47+5:302021-07-27T04:43:47+5:30

संगीता गोडबोले-बर्मन यांनी मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथील होत असलेल्या कामाची पाहणी सोमवार २६ जुलै रोजी केली. यावेळी श्रमदानातून ...

Initiative of Modak Smriti project for self reliance of villages | गावांच्या आत्मनिर्भरतेसाठी होण्यासाठी मोडक स्मृती प्रकल्पाचा पुढाकार

गावांच्या आत्मनिर्भरतेसाठी होण्यासाठी मोडक स्मृती प्रकल्पाचा पुढाकार

Next

संगीता गोडबोले-बर्मन यांनी मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथील होत असलेल्या कामाची पाहणी सोमवार २६ जुलै रोजी केली. यावेळी श्रमदानातून झालेल्या तलावाच्या स्थळी त्यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग आणि जलसंधारणचे सहायक प्रबंधक व्ही. डी. पाटील, समाजसेवक किशाभाऊ गोडबोले, डॉ. स्वराली गोडबोले हे उपस्थित होते. यावेळी व्ही. डी. पाटील म्हणाले की, गावाचा विकास होण्यासाठी केवळ प्रशासन, लोकसहभाग किंवा कोणी व्यक्ती पुढाकार घेऊन चालत नसून सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केल्यास गाव विकास होऊ शकतो. गावाचा विकास होणे ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे गावकऱ्यांची जागृती अत्यंत मोलाची आहे. समाजसेवक किशाभाऊ गोडबोले म्हणाले, गावासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी सहभाग घेतल्यास आम्ही सहकार्याकरिता पुरेपूर योग्य ती मदत करू. त्याचप्रमाणे इतर सहकार्य संस्थांकडून सुद्धा मदत मिळवावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक समन्वयक सचिन कुळकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामसभा अध्यक्ष विष्णू मंजुळकर यांनी केले.

______________________________________

तलावाचे "शिवसागर जलमंदिर" नामकरण

नुकताच पांगरी ग्रामसभेने तलावाला शिवसागर जलमंदिर नामकरण करण्याचा ठराव पारित केला होता. "शिवसागर जलमंदिरा"च्या फलकाचे संगिता गोडबोले-बर्मन ह्यांच्या शुभहस्ते विमोचन झाले. श्रमदानातून तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा मानस यावेळी गावकऱ्यांनी केला.

260721\img-20210726-wa0049.jpg

श्रमदानातून तयार केलेल्या तलावाचे नामकरण

Web Title: Initiative of Modak Smriti project for self reliance of villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.