शिरपूरच्या देवालयातील स्वच्छतेसाठी ‘स्वर्ग’ संस्थेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 03:18 PM2019-03-09T15:18:02+5:302019-03-09T15:18:20+5:30

शिरपूर जैन (वाशिम): राज्यातील नावाजलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या शिरपूर जैन येथील जानगीर संस्थानमध्ये कायम स्वच्छता राहावी, यासाठी स्वर्ग बहुद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आहे.

Initiative of 'Paradise' organization for cleanliness in Shirpur | शिरपूरच्या देवालयातील स्वच्छतेसाठी ‘स्वर्ग’ संस्थेचा पुढाकार

शिरपूरच्या देवालयातील स्वच्छतेसाठी ‘स्वर्ग’ संस्थेचा पुढाकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
शिरपूर जैन (वाशिम): राज्यातील नावाजलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या शिरपूर जैन येथील जानगीर संस्थानमध्ये कायम स्वच्छता राहावी, यासाठी स्वर्ग बहुद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांत होणारी घाण साफ करण्यासोबतच कचरा संकलित करण्यासाठी त्यांनी संस्थानला १२ डस्टबीन भेट केल्या आहेत.
शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानमध्ये वर्षभर विविध सणउत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. यानिमित्त भाविकांना महाप्रसादाचे, फराळाचे वितरणही केले जाते. राज्यातील विविध ठिकाणचे लाखो भाविक वर्षाकाठी येथे येतात. साहजजिकच येथे पार पडणाºया धार्मिक कार्यक्रमांदरम्यान, महाप्रसादाच्या वितरणानंतर मोठा कचरा आणि घाण पसरते. या घाणीवर नियंत्रण राहावे आणि मंदीर परिसर नेहमी स्वच्छ व प्रसन्न राहावा म्हणून स्वग बहुद्देशीय संस्था स्वच्छता उपक्रम राबविते. यंदाही महाशिवरात्री उत्सवादरम्यान त्यांनी जानगीर संस्थानवर स्वच्छता अभियान राबविले, तसेच कचरा वेळीच संकलित होऊन घाणीवर नियंत्रण राहावे, या उद्देशाने या संस्थेने जानगीर महाराज संस्थानला १२ डस्टबीन भेट दिल्या आहेत. यासाठी संस्थेचे मुकुंद मस्के, गोपाल बोबडे, मदन ननई, तुकाराम काळे, गोपाल मारवाडी, संतोष घाटोळे, विलास हंगे, राजू काळे, विनोद गावंडे, विशाल परीहार यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Initiative of 'Paradise' organization for cleanliness in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.