लसीकरणासाठी ग्रामस्तरीय समितीचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:41 AM2021-04-06T04:41:14+5:302021-04-06T04:41:14+5:30
.................. बोकड, शेळीच्या पिल्लाचा कुत्र्यांनी फडशा पाडला शिरपूर जैन : शेताजवळच्या नाल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या बोकड व शेळीच्या पिल्लाचा ...
..................
बोकड, शेळीच्या पिल्लाचा कुत्र्यांनी फडशा पाडला
शिरपूर जैन : शेताजवळच्या नाल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या बोकड व शेळीच्या पिल्लाचा ५ एप्रिल रोजी तीन कुत्र्यांनी फडशा पाडला. या घटनेत प्रल्हाद मस्के यांचे १२ हजार रुपयाचे नुकसान झाले.
...............
ध्वनिक्षेपकाद्वारे दुकाने बंद करण्याचे आवाहन
वाशिम : शहरातील दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे, मात्र त्याउपरही काही दुकाने सुरू ठेवली जातात. दरम्यान, सोमवारी पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्याचे दिसून आले.
................
राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण
वाशिम : मालेगाव ते हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गावरून गेल्या काही दिवसापासून वाहतूकदेखील सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
.............
एस.टी. बसमध्ये नियमांचे उल्लंघन
वाशिम : वाशिम ते अकोला मार्गावर धावत असलेल्या एस.टी. बसेसमध्ये प्रवाशांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. दैनंदिन होणारी गर्दी, तोंडाला मास्क नसणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत उदासीनता बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे.