जखमी वळूला गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:30 AM2021-06-02T04:30:38+5:302021-06-02T04:30:38+5:30
ग्रामीण जीवन हे शेतीवर आधारित असल्यामुळे पशुपालक शेतकरी मंडळी आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात या श्रद्धेपोटी आजूबाजूच्या देवस्थानांना गाई ...
ग्रामीण जीवन हे शेतीवर आधारित असल्यामुळे पशुपालक शेतकरी मंडळी आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात या श्रद्धेपोटी आजूबाजूच्या देवस्थानांना गाई / गोऱ्हे देवाच्या नावाने दान स्वरूपात सोडत असतात. असेच सावळी येथील श्रद्धाळूने वाई गौळला सोडलेला एक वळू मागील अनेक वर्षांपासून या गावात वास्तव्याला आहे. वाई गौळला इतरही तीन ते चार लहान-मोठे वळू आज रोजी भाविकांनी सोडलेले आहेत. बैलाची शिंगे साधारणतः वरच्या दिशेने वाढीत असतात; परंतु वाई गौळला असलेल्या या वळूची शिंगे ही खालच्या दिशेने वाढ होऊन डोळ्यांखालील भागात रुतून ह्या वळूला मोठ्या जखमा झाल्या आहेत. यामुळे वळूला दिसणे आणि चालणे-फिरणे व खाणेपिणेही बंद झालेले होते.
वाई गौळ येथील जागरूक नागरिक सुशील चव्हाण यांच्या नजरेत जखमी वळू आल्यानंतर त्यांनी गावातील प्रवीण चव्हाण, विलास राठोड, इंदल राठोड, योगेश जाधव, अमोल राठोड यांच्या मदतीने दोन्ही शिंगे काही प्रमाणात कापून आणि जखमेवर औषधाेपचार केल्याने वळूचे प्राण वाचलेले आहेत.