अपघातातील गंभीर जखमीचा औरंगाबाद येथे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 14:23 IST2018-09-25T14:22:22+5:302018-09-25T14:23:07+5:30
वाशिम : गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी ढोल-ताशे ठरविण्यासाठी नांदेड येथे जात असताना २० सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अपघातातील गंभीर जखमी मदन जयाजी चव्हाण याचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान २५ सप्टेंबरला मृत्यू झाला.

अपघातातील गंभीर जखमीचा औरंगाबाद येथे मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी ढोल-ताशे ठरविण्यासाठी नांदेड येथे जात असताना २० सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अपघातातील गंभीर जखमी मदन जयाजी चव्हाण याचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान २५ सप्टेंबरला मृत्यू झाला. या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले होते. त्यामुळे मृतकांची संख्या आता ७ वर पोहचली असून सखाराम जिजेबा जाधव याच्यावर सद्या नांदेड येथे उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली.
वाशिम येथील गणेश हजारे (२९), नरसिंह सोपान हजारे (२१), सतीश नारायण मुरकुटे (२८) यांच्यासह वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील राजू विष्णू धामणे (१९), अनिल गजानन चव्हाण (३०), स्वप्नील राम इरतकर, मदन जयाजी चव्हाण आणि सखाराम जिजेबा जाधव असे आठजण एम.एच. ३७ व्ही. २४४४ क्रमांकाच्या जीपने २० सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल-ताशे ठरविण्यासाठी नांदेडकडे जात होते. यादरम्यान, कलगाव पाटी गावाजवळ रात्री २ वाजताच्या सुमारास विरूद्ध दिशेने येणाºया ट्रकने दिलेल्या धडकेतमदन चव्हाण आणि सखाराम जाधव हे गंभीर जखमी झाले होते; तर अन्य सहाजणांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, मदन चव्हाण याचा औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना २५ सप्टेंबरला मृत्यू झाला. यामुळे सुरकंडी गावावर पुन्हा एकवेळ शोककळा पसरली आहे.