ट्रक-कारच्या अपघातातील ‘त्या’ जमखीचा मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:10 PM2018-05-10T17:10:29+5:302018-05-10T17:11:53+5:30
मेडशी (वाशिम) : कार व ट्रकची समारोसमोर धडक होऊन कारमधील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मालेगाव-अकोला महामार्गावरील रिधोरा फाट्याजवळ ९ मे रोजी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली होती. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या राहुल इंगळे यांचा ९ मे रोजी रात्रीदरम्यान मृत्यू झाला.

एमएच ३० एल ९१६६ क्रमांकाची कार ही मालेगावकडे जात होती तर आर.जे. २१ जीबी ९७१३ क्रमांकाचा ट्रक मेडशीकडे येत होता. रिधोरा फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन कारमधील राहुल साहेबराव इंगळे (३५) रा. सुकांडा ह.मु. बाभूळगाव, अकोला हे गंभीर जखमी झाले होते तर विजय वामन इंगळे (२३) रा. सुकांडा हे जखमी झाले. जखमीला तातडीने रूग्णवाहिकेद्वारे अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या राहुल इंगळे यांचा मृत्यू झाला.
रिधोरा फाटा बनतोय अपघातप्रवण स्थळ !
अलिकडच्या काळात रिधोरा फाट्यानजीक अपघाताच्या घटना जास्त घडत असल्याचे दिसून येते. पाच दिवसांपूर्वी तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन तीन जण ठार झाले होते. या घटनेची शाई वाळत नाही; तोच ९ मे रोजी अपघात होऊन एक जण ठार झाला. वाहनांच्या वेगावर नियंत्रण म्हणून काही ठिकाणी गतिरोधक निर्माण करणे तसेच वाहने हळू चालवा यासंदर्भात माहितीदर्शक फलक लावणे अपेक्षीत आहे.