मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:41 AM2021-03-05T04:41:16+5:302021-03-05T04:41:16+5:30
गावातील शेकडो महिलांना विमा सुरक्षा कवच निराधार महिलांना महिन्याकाठी मोफत धान्य मानोरा : तालुक्यातील कारखेडा येथील नवनियुक्त ...
गावातील शेकडो महिलांना विमा सुरक्षा कवच
निराधार महिलांना महिन्याकाठी मोफत धान्य
मानोरा : तालुक्यातील कारखेडा येथील नवनियुक्त सरपंच सोनाली बबनराव सोळंके व उपसरपंच अनिल सीताराम काजळे यांनी २ मार्च रोजी गावहिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या. त्यामध्ये सर्व महिलांना विमा सुरक्षा कवच, स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी व मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी मुलगी जन्मताच मुलीच्या नावे १ हजार रुपये १८ वर्षांसाठी फिक्स डिपाॅझिट केले जाणार असून माता - पित्यांचा सत्कार होणार आहे.
घरचा कर्ता पुरुष गेल्याने निराधार झालेल्या कुटुंबांना महिन्याकाठी मोफत धान्य दिले जाणार आहे. त्याआधी ते कुटुंब अंत्योदयखाली आणण्याचा संकल्पसुद्धा करण्यात आला. गावात चालू असलेली ‘टॅक्स भरा, मोफत दळा’ ही मोफत पीठगिरणी आगामी काळातसुद्धा चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी ग्रामसेवक अनिल सूर्य, सदस्य प्रमिला राजू चव्हाण, गणेश रामधन जाधव, वर्षा मोहन देशमुख, दिलीप गोपाळराव देशमुख, मनोज किशोर तायडे, प्रभाकरराव भोयर, लक्ष्मणराव मात्रे, सुभाष परांडे, किशोर देशमुख, राजू राऊत, गुणवंत राऊत, गोपाल देशमुख, मोहन जाधव, देवराव पिंगाने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.