गरिबांच्या समस्यांसाठी अभिनव आंदोलन

By admin | Published: June 14, 2017 08:08 PM2017-06-14T20:08:21+5:302017-06-14T20:08:21+5:30

आमदल सामाजिक संस्थेचा उपक्रम: सामाजिक संघटना, नागरिकांना सहभागाचे आवाहन

Innovative movement for the problems of the poor | गरिबांच्या समस्यांसाठी अभिनव आंदोलन

गरिबांच्या समस्यांसाठी अभिनव आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विविध सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समस्यांनीग्रस्त असलेल्या गरीबांची हाक शासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमदल ही सामाजिक संघटना करणार आहे. यासाठी त्यांनी १५ जून ते १५ सप्टेंबर २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधित गरीबांच्या उद्धारासाठी आवश्यक असलेला ११ कलमी कार्यक्रम घेऊन ह्यगरीबार्थ आंदोलनह्ण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदलचे प्रमुख गंगाधर कांबळे यांच्या नेतृत्वात वाशिमसह अकोला, यवतमाळ, हिंगोली, परभणी आणि नांदेड या सहा जिल्ह्यात हे आंदोलन राबविण्यात येणार आहे. व्यापक जनहित साधल्या जाणाऱ्या या गरिबार्थ आंदोलनाचा ११ कलमी कार्यक्रमात गोरगरीब कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, असधन औद्योगिक धोरण तयार करावे, शेतमजूर, बेघर, बेरोजगारांच्या उत्थानासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, गाव-खेडी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रुरल स्माल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशनची निर्मिती करावी, सदा स्थलांतरीत आणि पाल वाडी वस्तीवरील फिरस्ती कुटुंबांसाठी फिरत्या रेशनकार्डची व त्यांच्या सर्वांगीण उत्कर्षाची व्यवस्था करावी, सरपंचाला विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार द्यावा, तसेच सरपंच रिलिफ फंडची उभारणी करावी, विधवा-परितक्त्या महिलांना किमान उपजिविका भागले इतके दरमहा पाच रुपये अनुदान मिळावे, बचत गटाच्या महिलांना कालसुसंगत उद्योजकीय ज्ञान मिळण्यासाठी जिल्हास्तरावर एक प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करावे, भावी उद्योजकीय पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक विभागवार एक नवोत्तम उद्योजकी निर्माण केंद्र स्थापन करावे, सरकारच्या विविध योजना विकास कामांचा थेट जनतेपर्यंत जाणारा प्रचार-प्रसार फक्त लोककलेद्वारेच करून घेऊन त्यासाठी लोककलावंताना दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे, अपंगांच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात यावा, आदि मागण्यांचा समावेश आहे.

 

Web Title: Innovative movement for the problems of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.