पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहारांची चौकशी व्हावी ; धुमकावासीयांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:26 PM2018-02-05T15:26:57+5:302018-02-05T15:28:29+5:30
वाशिम : तालुक्यातील धुमका येथे भारत निर्माण योजनेंतर्गत ३३ लाख ३१ हजार ४२० रुपयांचा खर्च दाखवून पाणीपुरवठा योजनेचे काम झाल्याचे दर्शविण्यात आले आहे.
वाशिम : तालुक्यातील धुमका येथे भारत निर्माण योजनेंतर्गत ३३ लाख ३१ हजार ४२० रुपयांचा खर्च दाखवून पाणीपुरवठा योजनेचे काम झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र हे काम झालेच नाही. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी बाबाराव राठोड, सुधाकर राठोड, शंकर पवार यांच्यासह इतर ग्रामस्थांनी राज्याचे महसूलमंत्री तथा वाशिम जिल्हा पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
धुमका येथे २००७ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने भारत निर्माण योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम केल्याचे दर्शविले आहे. असे असताना आजपर्यंतही गावकºयांना या योजनेतून पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या गावकºयांनी या प्रश्नावर यापूर्वी देखील आंदोलने केली. मात्र, त्याचा विशेष फायदा झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकवेळ पालकमंत्र्यांकडे निवेदन सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली.
धुमका येथील भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेची चौकशी सुरू असून हे काम नियमानुसारच पूर्ण करण्यात आले आहे. गावातील अनेक ग्रामस्थांना नळ कनेक्शन देण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. गावकºयांनी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- नीलेश राठोड
उपकार्यकारी अभियंता
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, वाशिम