पाणंद रस्त्याची चौकशी थंडबदस्त्यात!

By admin | Published: August 23, 2016 12:02 AM2016-08-23T00:02:46+5:302016-08-23T00:02:46+5:30

रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथे ‘मग्रारोहयो’त लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप.

Inquire into Pune | पाणंद रस्त्याची चौकशी थंडबदस्त्यात!

पाणंद रस्त्याची चौकशी थंडबदस्त्यात!

Next

रिसोड(जि. वाशिम), दि. २२: तालुक्यातील मांगवाडी ग्रामपंचायतने गावात मंजूर झालेल्या पाणंद रस्त्याचे काम न करताच १ लाख ३३ हजार रूपयाचे देयक काढल्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची तक्रार मांगवाडी येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे २ ऑगस्टला केली असताना २0 दिवस उलटूनही याप्रकरणी कुठलीच ठोस चौकशी झालेली नाही.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २0१६ या आर्थिक वर्षामध्ये रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथील जुना शेलु रोड ते नेर शिवपर्यंंत पाणंद रस्ता मंजूर करण्यात आला होता. या पाणंद रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. मात्र, काम झालेले नसतानाही १४ मे ते २0 मे २0१६ पर्यंंंतच्या कामाचे मस्टर तयार करण्यात आले. हजेरी पत्रक ५१८, ९0८ च्या एम.बी.नुसार काम झाल्याचे नोंदवून ६७ हजार २६ रूपये व ६६ हजार ९६६ रूपये अशाप्रकारे रक्कम काढण्यात आली.
याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी दिनकर कांबळे व हरिदास वाळके यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी रिसोडचे तहसिलदार अमोल कुंभार यांना चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Inquire into Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.