मंगरुळपीरमधील कामांची चौकशी थंडबस्त्यात

By admin | Published: July 9, 2017 07:44 PM2017-07-09T19:44:05+5:302017-07-09T19:44:05+5:30

मंगरुळपीर: शहरात शासनाच्या निधीतून मागील चार ते पाच महिन्यांपासून करण्यात आलेल्या विविध विकास कामांत नियमांना बगल देण्यात आल्याच्या तक्रारी आमदार लखन मलिक यांच्यासह शासनाकडे नगरसेवकांनी केल्यात.

Inquire into work in Mangirlipar | मंगरुळपीरमधील कामांची चौकशी थंडबस्त्यात

मंगरुळपीरमधील कामांची चौकशी थंडबस्त्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: शहरात शासनाच्या निधीतून मागील चार ते पाच महिन्यांपासून करण्यात आलेल्या विविध विकास कामांत नियमांना बगल देण्यात आल्याच्या तक्रारी आमदार लखन मलिक यांच्यासह शासनाकडे नगरसेवकांनी केल्यात. या तक्रारीची दखल आमदार लखन मलिक यांनी घेऊन मंगरुळपीरच्या मुख्याधिकाऱ्यांना २८ जून रोजी एक पत्र पाठवून चौकशी करण्याची सूचना दिली आहे; परंतु या पत्रानुसार मुख्याधिकाऱ्यांची चौकशी थंडबस्त्यात आहे. 
मंगरुळपीर शहरांतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी शासनाकडून २९  लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरात पेव्हरब्लॉक रस्ते, तसेच नाल्यांच्या कामांसह इतर विकास कामे करण्यात येत आहेत. त्यामधील बहुतेक कामे पूर्ण झाली असून, एकूण १५ कामांपैकी १४ कामे निकृष्ट असल्याच्या तक्रारी नागरिक आणि नगर सेवकांनी मुख्याधिकाऱ्यांसह विविध स्तरावर केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल पालिकेच्या संबंधित प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. याबाबत वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. त्यांनी नागरिकांसह नगरसेवकांच्या तक्रारीची दखल घेत मंगरुळपीर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र पाठवित सर्व कामांची चौकशी करून संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे व चालू असलेल्या आणि झालेल्या कामाची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागव गुणनियंत्रण विभागाकडून करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कामाचे देयक अदा करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. तथापि, याला १० दिवस उलटून गेले, तरी मुख्याधिकाऱ्यांकडून काय चौकशी करण्यात आली किंवा कंत्राटदारांना कोणत्या सूचना देण्यात आल्या. ते कोणालाही माहिती नाही. त्यावरून मंगरुळपीर नगर पालिका प्रशासन पारदर्शकतेबाबत किती गंभीर आहे, त्याची प्रचिती येत असून,  या प्रकाराची दखल आता जिल्हाधिकाऱ्यांनीच घेणे आवश्यक आहे.  दरम्यान, याबाबत वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिसाद मिळू शकला नाही.

Web Title: Inquire into work in Mangirlipar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.