भर जहागिर येथील शौचालय गैरप्रकाराची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 01:25 PM2018-11-10T13:25:38+5:302018-11-10T13:26:23+5:30
शौचालय अनुदानात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी तात्काळ करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी रिसोडच्या गटविकास अधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत.
रिसोडच्या बिडीओंना पत्र: उपमुख्यकार्यकारी अधिकाºयांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
भर जहागिर (वाशिम): रिसोड तालुक्यातील भर जहागिर येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय अनुदानात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी तात्काळ करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी रिसोडच्या गटविकास अधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत. या संदर्भात लोकमतने १३ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
भर जहागिर येथी सुधाकर काळबांडे यांनी रिसोड पंचायत समिती, तसेच जिल्हा परिषदेकडे भर जहागिर येथील शौचालय अनुदान वितरणात गैरप्रकार झाल्याची तक्रार केली होती. एकाच व्यक्तीला तीन वेळा शौचालयाचे अनुदान देण्यासह शौचालय बांधकाम न करता अनुदानाचा लाभ घेतल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद करताना या प्रकरणी २२ लाभार्थींवर कारवाई करून शौचालयाचे अनुदान परत घेण्याची मागणी केली होती. या संदर्भात संबंधित २२ लाभार्थींना शौचालयाचे अनुदान परत करण्याची नोटीस प्रशासनाने बजावल्यानंतरही त्यांनी शौचालयाचे अनुदान परत केले नाही. त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, असे त्यांनी तक्रारीत नमूद करताना उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या प्रकरणी लोकमतने १३ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या प्रकाराची इखल जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी घेत रिसोडच्या गटविकास अधिकाºयांना पत्र पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाला सादर करण्याचेही आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत.