कृषी अधिकाऱ्यांकडून सोयाबीन पेरणीच्या अमर पट्टा पद्धतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:12+5:302021-07-04T04:27:12+5:30

तुरीच्या दोन तासांमध्ये फक्त चार तास राहतात व तुरी जवळचे दोन तास बंद असल्यामुळे तुरीला हवा लागते व सोयाबीनसुद्धा ...

Inspection of Immortal Leaf Method of Soybean Sowing by Agriculture Officers | कृषी अधिकाऱ्यांकडून सोयाबीन पेरणीच्या अमर पट्टा पद्धतीची पाहणी

कृषी अधिकाऱ्यांकडून सोयाबीन पेरणीच्या अमर पट्टा पद्धतीची पाहणी

Next

तुरीच्या दोन तासांमध्ये फक्त चार तास राहतात व तुरी जवळचे दोन तास बंद असल्यामुळे तुरीला हवा लागते व सोयाबीनसुद्धा बेडवर येते. अमर पट्टा पद्धतीमुळे बियाणांची आठ ते दहा किलोपर्यंत बचत होऊ शकते, तसेच कीड व रोगाचा सुद्धा बचाव होऊ शकते. तसेच उत्पादनामध्ये सुद्धा २० ते २५ टक्के वाढ होऊ शकते. याबाबत केशव भगत यांनी सविस्तर माहिती सांगितली. साधारणत: फुले पकडण्याच्या किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट येत आहे; परंतु त्याला अमर पट्टा पद्धती अपवाद ठरू शकते, कारण त्यामध्ये सोयाबीन बेडवर येत असल्यामुळे जरी पावसाचा खंड पडला तरी सोयाबीनला फारसा पावसाचा ताण जाणवणार नाही. जास्त जरी पाऊस झाला तरी त्यामधून ते वाहून जाऊ शकते व मूलस्थानी जलसंधारण होऊ शकते. त्यामुळे ही पद्धत एक बचतीची व शेतकऱ्यांना फायदा देणारी आहे. तरी याबाबत शेतकऱ्यांनी माहिती घेऊन त्याचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांनी तणनाशक खरेदी करताना व फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य रामेती, टेकाळे, तंत्र अधिकारी कंकाळ, तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी अंभोरे, कृषी पर्यवेक्षक मिलिंद कांबळे, कृषी सहायक पुरुषोत्तम सांगोडे, अमोल हिसेकर, प्रवीण ठाकरे यावेळी हजर होते.

Web Title: Inspection of Immortal Leaf Method of Soybean Sowing by Agriculture Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.