शिक्षण विभागाकडून शाळांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:26+5:302021-02-05T09:21:26+5:30

--------------- बांबर्डा येथे समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत प्रशिक्षण बांबर्डा कानकिरड : समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत बांबर्डा कानकिरड गावाचा समावेश आहे. या ...

Inspection of schools by the Department of Education | शिक्षण विभागाकडून शाळांची पाहणी

शिक्षण विभागाकडून शाळांची पाहणी

Next

---------------

बांबर्डा येथे समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत प्रशिक्षण

बांबर्डा कानकिरड : समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत बांबर्डा कानकिरड गावाचा समावेश आहे. या गावात स्पर्धेतील विविध कामांना वेग आला आहे. त्यात पहिल्या तीन टप्प्यांतील प्रशिक्षण पार पडल्यानंतर शनिवारपासून येथे चौथ्या टप्प्यातील प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. यात विहिरी, कूपनलिकांच्या पातळीची मोजणी, हंगामनिहाय पीक माहितीचे संकलन कसे करावे, याबाबत गावकरी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

-------------

वनदेवीनगरात आणखी एक बाधित

कारंजा : शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यात वनदेवीनगरात चार दिवसांपूर्वी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर सोमवारी पुन्हा येथील एक व्यक्ती बाधित असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले. त्याशिवाय शहरातील इतर भागांतीलही एक व्यक्ती बाधित असल्याचे निदान झाले आहे.

---------------

समृद्धीच्या कामाची पाहणी

धनज बु.: कारंजा तालुक्यात गत चार वर्षांपासून समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. सद्य:स्थितीत या मार्गावरील पुलांचे काम वेगाने केले जात असून, या कामाची पाहणी सोमवारी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. कामाचा दर्जा राखण्याबाबत विशेष काळजी घेण्यासह परिसरातील ग्रामस्थांना वाहनांचा त्रास होऊ नये, अशा सूचनाही यावेळी त्यांनी यंत्रणेला दिल्या.

Web Title: Inspection of schools by the Department of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.