निकृष्ट दर्जाच्या मूग डाळीची वरिष्ठांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:42+5:302021-06-25T04:28:42+5:30
धनज बु... येथील अंगणवाडीमधून वितरित करण्यात आलेली मूग डाळ ही निकृष्ट दर्जाची ...
धनज बु... येथील अंगणवाडीमधून वितरित करण्यात आलेली मूग डाळ ही निकृष्ट दर्जाची असल्याचे वृत्त लोकमतने २४ जूनला प्रकाशित केले होते. त्याची दाखल घेऊन जिल्हा परिषदेच्या पोषण आहार विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालकांना, गर्भवती स्त्रियांना व स्तनदा माता ना पोषक आहार देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सुरु केली आहे; परंतु लाभार्त्यांना वितरित करण्यात येत असलेले धान्य हे दर्जाहीन असल्याचा प्रकार धनज बु. येथे आढळून आला आहे.
मसूर डाळ ऐवजी देण्यात आलेली मूग डाळ दर्जाहीन असून, ही मूग डाळ बालकांच्या व स्तनदा मातांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्याचीच दखल घेत कारंजा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, विस्तार अधिकारी जे. बी. जोशी, पर्यवेक्षिका एन. ओ. चव्हाण यांनी या मूग डाळीची पाहणी केली.
यावेळी पंचायत समिती सदस्य मयूर म्हस्के, लाभार्थी सचिन गुल्हाने, संदीप शिवहरे, दीपक डफडे, सचिन ढाकरे, सुमित तवार व सर्व अंगणवाडीसेविका उपस्थित होत्या.
कारंजा प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सर्व अंगणवाडीमधील मूग डाळ ही प्रयोगशाळेत नेऊन त्याचा अहवाल मागून त्याची चौकशी करण्यात येईल. डाळ दर्जाहीन आढळून आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात यईल.
मदन नायक,
बाल विकास प्रकल्प अधिकारी.