रोहयो मंत्र्यांकडुून वृक्ष लागवड कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:41 AM2021-04-22T04:41:54+5:302021-04-22T04:41:54+5:30
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक डोंगरदिवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे, कारंजा उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, गटविकास अधिकारी कालिदास तापी, ...
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक डोंगरदिवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे, कारंजा उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, गटविकास अधिकारी कालिदास तापी, जानोरीचे कार्यकारी सरपंच नितीन भिंगारे, ग्रामपंचायतचे सचिव जी. ए. उपाध्ये यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जानोरी ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास ३० एकर ई- क्लास जमिनीवर आवळा, बादाम, कडुनिंब यासह अन्य प्रजातीच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जवळच तयार करण्यात आलेल्या शेततळ्यातून या वृक्षांना कामावरील मजूर पाणी देत असल्यामुळे वृक्षांची चांगली वाढ झाली आहे. २७ मजुरांना या कामावर रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती ग्राम सचिव उपाध्ये यांनी दिली. लोकसहभागातून जानोरी ग्रामस्थ विविध उपक्रम व योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करीत असल्याने यापुढेही नवीन योजना राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन ना. भुमरे यांनी यावेळी दिले.