अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पाहणी
By admin | Published: February 22, 2017 02:18 AM2017-02-22T02:18:39+5:302017-02-22T02:18:39+5:30
वाशिम येथे केंद्रित पथक दाखल; शेतकरी बचत गट समूहाशी साधला संवाद.
वाशिम, दि. २१- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या चमूने जिल्हय़ात मंगळवारी पाहणी केली. या दरम्यान चमूने शेतकरी बचत गट समूहाशीदेखी संवाद साधला.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. बाबतीवाले, भारत सरकारच्या कापूस विकास केंद्राचे संचालक तथा महाराष्ट्र व गोवा राज्याचे नोडल अधिकारी डॉ. आर.टी. सिंह, कडधान्याचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. गौड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, तालुका कृषी अधिकारी तांबिले आदींनी मंगळवारी रिसोड तालुक्यात किनखेडासह अन्य गावांना भेटी देऊन पाहणी केली. अन्नसुरक्षा अभियानाची चोख अंमलबजावणी करण्याच्या सूचना डॉ. बाबतीवाले यांनी केल्या. याचदरम्यान कृषी विभागाच्या केंद्रस्तरीय अधिकार्यांनी किनखेडा येथे बचत गटाच्या शेतकर्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. अन्नसुरक्षा अभियान व कडधान्य अभियानासंदर्भात केंद्रस्तरीय चमू जिल्हय़ात आल्याची माहिती गावसाने यांनी दिली. यावेळी जि.प. सदस्य स्वप्निल सरनाईक, पांडुरंगअण्णा अवचार, दिनकर भुतेकर, आकातराव सरनाईक, पंजाब अवचार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.