सोमठाणा तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:19 AM2021-02-21T05:19:01+5:302021-02-21T05:19:01+5:30
यवतमाळ, अकोला, अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव दिसत असुन तिन्ही जिल्ह्याच्या सिमा वाशिम जिल्ह्याला लागुन असल्याने जिल्हा प्रशासनाने ...
यवतमाळ, अकोला, अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव दिसत असुन तिन्ही जिल्ह्याच्या सिमा वाशिम जिल्ह्याला लागुन असल्याने जिल्हा प्रशासनाने यवतमाळ व वाशिम जिल्ह्याची सिमा असलेल्या कारंजा दारव्हा मार्गांवरील सोमठाणा फाटा येथे चेक पोस्ट सुरू करण्यात आले असुन २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यत सहा वाहनचालकांवर मास्कचा वापर केला नसल्याने आढळून आले असल्याने दंडात्मक कारवाई करून ३००० रूपये दंड वसुल करण्यात आला.
चेक पोस्टला कारंज्याचे तहसीलदार धिरज मांजरे यांनी भेट देवुन उपस्थित कर्मचारी मंडळीना आवश्यक मार्गदर्शन करून सुचना दिल्या .चेक पोस्टवर कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंदर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव गोलाम व वाहतूक शाखेचे जमादार संतोष राठोड वाहनांची तपासणी* करण्यात येत असुन उंबर्डा बाजार आरोग्यवधर्नी केन्द्राचे वैधकीय अधिकारी एस.आर. नांदे यांचे मार्गदर्शनात रवि बागडे , जयश्री श्रीरामे तथा अनिता धारपवार आरोग्य विषयक तपासणी* कामात मदत करीत आहे.