जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 02:54 PM2018-11-30T14:54:07+5:302018-11-30T14:54:42+5:30
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी जिल्हा परिषदेच्या हर्षदा देशमुख यांच्यासह अधिकाºयांच्या चमूने गुरूवार, शुक्रवारी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी जिल्हा परिषदेच्या हर्षदा देशमुख यांच्यासह अधिकाºयांच्या चमूने गुरूवार, शुक्रवारी केली.
जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या सिंचन तलाव, कोल्हापुरी बंधारा, साठवण तलाव इत्यादी कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, लघु सिंचन विभागाच्या अभियंत्यांच्या चमूने दौरे केले. रिसोड तालुक्यातील पिंगलाक्षी येथील सिंचन तलाव, पेनबोरी येथील कोल्हापुरी बंधारा, मांगुळ रुनक येथील नवीन कोल्हापुरी बंधारा आणि मालेगााव तालुक्यातील माळेगाव नजीक किन्ही येथील साठवण तलावाची पाहणी केली.
किन्ही येथील साठवण तलावाचे काम पुर्ण झाले असून, हर्षदा देशमुख यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. याप्रसंगी जि.प. सदस्या विजया घुगे, लघुसिंचन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता विजयसिंग गहेरवार, उपकार्यकारी अभियंता राजेश कोठेकर, उपअभियंता विश्वास घुगे, उपअभियंता काशीराम बोके, कनिष्ठ अभियंता प्रियंका बोर्डे, बिपिन सपकाळ, दर्शन खंडाळकर, अमोल देशपांडे, सेवाराम चव्हाण आदींची उपस्थिती होती.