नियमबाह्य उघडलेले पाचवी, आठवीचे वर्ग बंद करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 05:24 PM2019-05-08T17:24:49+5:302019-05-08T17:24:56+5:30
वाशिम - जिल्हा परिषद शाळांनी अंतराची अट न पाळता नियमबाह्य उघडलेले इयत्ता पाचवी, आठवीचे वर्ग बंद करण्यात यावे असे आदेश शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी अमरावती विभागातील पाचही मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना ७ मे रोजी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - जिल्हा परिषद शाळांनी अंतराची अट न पाळता नियमबाह्य उघडलेले इयत्ता पाचवी, आठवीचे वर्ग बंद करण्यात यावे असे आदेश शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी अमरावती विभागातील पाचही मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना ७ मे रोजी दिले आहेत.
शासन निर्णय २ जुलै २०१३ आणि २८ आॅगस्ट २०१५ अन्वये जि.प.शाळांना अंतराची अट पाळून इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करता येतात. परंतू, अंतराची अट न पाळता तसेच अन्य बाबींची पुर्तता न करताच काही ठिकाणी नियमबाह्य वर्ग जोडण्यात आल्याची बाब शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांच्या निदर्शनात आणून दिली होती. जि. प. शाळांजवळ पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसताना तसेच प्रयोगशाळा, गणित व विज्ञान शिक्षकांचा अभाव असतांना काही ठिकाणी पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्यात आले होते. २ जुल २०१३ च्या शासननिर्णयात स्पष्ट उल्लेख आहे की, अंतराची अट लक्षात घेता ज्या ठिकाणी शिक्षणाची सोय नसेल त्याच ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था करावयाची आहे. पण काही ठिकाणी चुकीचा अर्थ घेऊन सरसकट वर्ग सुरु केले आहेत, ही बाबही भोयर यांनी निदर्शनात आणून दिली होती. कायद्याच्या चौकटीत राहुन फक्त नियमबाह्य असलेले अनधिकृत वर्ग बंद करावे, अशी मागणी शिक्षण संचालकांकडे केली होती. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद शाळांनी अंतराची अट न पाळता नियमबाह्य उघडलेले इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग बंद करण्यात यावे असे आदेश शिक्षण संचालक चौहान यांनी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.