घरकुल लाभार्थीची ३० हजाराची रक्कम अचूक बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:40 PM2018-07-29T13:40:41+5:302018-07-29T13:44:27+5:30

लाभार्थीच्या बँक खात्यात चुकीने जमा केलेले ३० हजार रुपये परत घ्यावे तसेच पात्र लाभार्थीच्या बँक खाते क्रमांकाची दुरूस्ती करून घरकुलाचे अनुदान जमा करण्याचे निर्देश पंचायत समिती तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले. 

Instructions for depositing 30 thousand rupees in the correct bank account | घरकुल लाभार्थीची ३० हजाराची रक्कम अचूक बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश  

घरकुल लाभार्थीची ३० हजाराची रक्कम अचूक बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश  

googlenewsNext
ठळक मुद्दे दुर्गा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान रिठद येथीलच अन्य एका प्रतिक्षा यादीतील लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झाले. बँक खात्यात जमा केल्याची बाब ‘लोकमत’ने २५ जुलै रोजी उघडकीस आणताच, जिल्हास्तरावरून तातडीने सूत्रे हलली.कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचनाही दिल्या जातील, अशी माहिती देशमुख यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रिसोड पंचायत समितीअंतर्गत येणाºया रिठद येथील एका लाभार्थीचे ३० हजार रुपयांचे अनुदान दुसºयाच लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केल्याची बाब ‘लोकमत’ने २५ जुलै रोजी उघडकीस आणताच, जिल्हास्तरावरून तातडीने सूत्रे हलली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी प्रतिक्षा यादीतील त्या लाभार्थीच्या बँक खात्यात चुकीने जमा केलेले ३० हजार रुपये परत घ्यावे तसेच पात्र लाभार्थीच्या बँक खाते क्रमांकाची दुरूस्ती करून घरकुलाचे अनुदान जमा करण्याचे निर्देश पंचायत समिती तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले. 
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात रिठद ता. रिसोड येथील दुर्गा सोपान धुळधुळे, कमल ज्ञानबा धुळधुळे या दोन लाभार्थींना घरकुल मंजूर झाले. या लाभार्थींकडून अचूक बँक खाते क्रमांक संकलित केल्यानंतर अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ३० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले. दुर्गा सोपान धुळधुळे व कमल ज्ञानबा धुळधुळे यांनी अचूक बँक खाते क्रमांक दिल्यानंतर पंचायत समिती स्तरावरील संबंधित कर्मचाºयाने चुकीचे बँक खाते क्रमांक ‘फिडींग’ केल्याने अनुदान वितरणाचा घोळ निर्माण झाला. कमल ज्ञानबा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान दुर्गा सोपान धुळधुळे यांच्या बँक खात्यात जमा झाले तर दुर्गा धुळधुळे यांचे ३० हजार रुपयांचे अनुदान रिठद येथीलच अन्य एका प्रतिक्षा यादीतील लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झाले. एका वर्षानंतरही बँक खाते क्रमांकात दुरूस्ती झाली नसल्याने धुळधुळे यांचे घरकुल बांधकामाचे स्वप्न धुळीस मिळाले. प्रतिक्षा यादीतील अन्य लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झालेली ३० हजार रुपयांची रक्कम अद्याप पंचायत समिती प्रशासनाने परत घेतली नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने २५ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करताच, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश रिसोड पंचायत समिती प्रशासनाला दिले. प्रतिक्षा यादीतील लाभार्थीच्या बँक खात्यात चूकीने जमा झालेली ३० हजार रुपयाची रक्कम तातडीने परत घ्यावी तसेच धुळधुळे या लाभार्थीला न्याय द्यावा, अशा सूचना पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला देण्यात आल्या. याप्रकरणी टाळाटाळ करणाºयांविरूद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचनाही दिल्या जातील, अशी माहिती देशमुख यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Instructions for depositing 30 thousand rupees in the correct bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.