महामार्गांच्या कामांवरील मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:52 AM2020-03-24T11:52:26+5:302020-03-24T11:53:18+5:30

राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी महामार्गावरील कामांवरही याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी.

Instructions for medical examination of laborers on highway works | महामार्गांच्या कामांवरील मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना

महामार्गांच्या कामांवरील मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असून या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी महामार्गावरील कामांवरही याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी तसेच या कामांवर असलेले उपकंत्राटदार, मजूर, वाहनचालक, क्लीनर यासह इतर कामगारांची वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी संबंधित कंत्राटदारांना २३ मार्च रोजी दिला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १३ मार्च २०२० पासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार या उपाययोजनांचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी महामार्गावर काम करणाºया मजुरांचीही एकाच ठिकाणी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा. त्यांची वैद्यकीय तपासणी करावी तसेच त्यांना मास्क, सॅनिटायझर वापर करण्याबाबत अवगत करावे. महामार्गावरील मजूर लगतच्या गावातील लोकांच्या संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकारी मोडक यांनी सर्व संबंधित कंत्राटदारांना दिला. या आदेशाचे पालन न करणाºया कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
(प्रतिनिधी)

Web Title: Instructions for medical examination of laborers on highway works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.