रेशन दुकानांमध्ये सूचना फलक लावण्याचे निर्देश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:30 IST2019-04-12T16:30:00+5:302019-04-12T16:30:07+5:30
वाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणणे आणि संसदेच्या लोकलेखा समितीने सादर केलेल्या अहवालानुसार एकूण आठ मुद्यांच्या अनुषंगाने रेशन दुकानांमध्ये सूचना फलक लावण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यंत्रणेने राज्यभरातील पुरवठा विभागाला ११ एप्रिल रोजी दिले आहेत.

रेशन दुकानांमध्ये सूचना फलक लावण्याचे निर्देश !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणणे आणि संसदेच्या लोकलेखा समितीने सादर केलेल्या अहवालानुसार एकूण आठ मुद्यांच्या अनुषंगाने रेशन दुकानांमध्ये सूचना फलक लावण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यंत्रणेने राज्यभरातील पुरवठा विभागाला ११ एप्रिल रोजी दिले आहेत. या निर्देशाच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत पात्र रेशनकार्डधारकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये पारदर्शकता राहावी, याकरीता संसदेच्या लोकलेखा समितीने काही शिफारशी केल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार अन्नधान्याची निर्धारीत केलेली किंमत, त्याचे प्रमाणाबाबत माहिती असलेला फलक प्रत्येक रेशन दुकानांमध्ये प्रदर्शित करण्याच्या सूचना लोकलेखा समितीच्या अहवालात दिलेल्या आहेत. त्यानुसार लाभार्थींनाा वितरित करण्यात येणाºया अन्नधान्याचे प्रमाण, किरकोळ विक्रीचे मुल्य, अन्नधान्याची पात्रता, रेशन दुकाने उघडणे व बंद करण्याची वेळ, भोजनाची वेळ तसेच अन्नधान्याचा दर्जा आणि प्रमाण आदींबाबत काही तक्रारी असल्यास त्या कोणत्या अधिकाºयांकडे कराव्यात, त्याचबरोबरच तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन क्रमांक आदींची माहिती असणारा फलक रेशन दुकानांमध्ये सर्वांना सहज दिसेल, अशा ठिकाणी लावण्यात यावा, असे लोकलेखा समितीच्या अहवालात नमूद आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने सूचना फलक लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यंत्रणेने पुरवठा विभागाला दिले आहेत. सदर सूचना फलक सर्व रेशन दुकानदारांनी लावले आहेत का? याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी व नियंत्रकांनी करावी आणि त्याचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करावा, असेही अन्न, नागरी पुरवठा विभागाने बजावले आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.