अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम तातडीने करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 07:25 PM2017-08-16T19:25:13+5:302017-08-16T19:26:25+5:30

वाशिम : वाशिम येथे सुरू असलेल्या प्लॅनेटोरियम, अ‍ॅडव्हेंचर पार्कच्या कामाला भेट दिल्यानंतर सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी दिल्या.

Instructions for urgent work on adventure park | अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम तातडीने करण्याच्या सूचना

अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम तातडीने करण्याच्या सूचना

Next
ठळक मुद्देमहसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली कामाची पाहणी प्लॅनेटोरियम, अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम जलद गतीने करण्याच्या दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम येथे सुरू असलेल्या प्लॅनेटोरियम, अ‍ॅडव्हेंचर पार्कच्या कामाला भेट दिल्यानंतर सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी दिल्या.
यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, तहसीलदार बळवंत अरखराव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे आदी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम प्लॅनेटोरियमची निर्मिती व अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम सुरु आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री ना. राठोड यांनी दोन्ही कामांची पाहणी केली. यावेळी बी. एस. देशमुख यांनी प्लॅनेटोरियममध्ये बसविण्यात येणाºया प्रतिकृतींची, फोर के सिस्टीम यासह इतर बाबींची माहिती दिली.  यावेळी पालकमंत्र्यांनी प्लॅनेटोरियम, अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. प्लॅनेटोरियम व अ‍ॅडव्हेंचर पार्क सुरु झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील पर्यटनास चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Instructions for urgent work on adventure park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.