समन्वयाने काम करण्याच्या सूचना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:18 AM2021-02-21T05:18:43+5:302021-02-21T05:18:43+5:30

००० वाहनचालकांची तपासणी मोहीम वाशिम : टिबल सीट, विनामास्क प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी वाशिम शहर वाहतूक शाखेच्या चमूतर्फे केली ...

Instructions for working in coordination! | समन्वयाने काम करण्याच्या सूचना !

समन्वयाने काम करण्याच्या सूचना !

Next

०००

वाहनचालकांची तपासणी मोहीम

वाशिम : टिबल सीट, विनामास्क प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी वाशिम शहर वाहतूक शाखेच्या चमूतर्फे केली जात आहे. दिनांक १९ व २० फेब्रुवारी रोजी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या जवळपास ९६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

०००

२४ फेब्रुवारीला ‘नवोदय’ची परीक्षा

वाशिम : जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथील नववीच्या वर्गातील रिक्त जागांसाठी २४ फेब्रुवारी रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावे, असे आवाहन प्राचार्य आर. एस. चंदनशीव यांनी केले आहे.

००००

क्षयरुग्णांची माहिती सादर करा !

वाशिम : क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी खासगी रुग्णालयांनी क्षयरुग्णांची नोंद करणे बंधनकारक आहे. क्षयरुग्णांच्या या नोंदीची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी, वाशिम यांच्याकडे सादर करावी, अशा सूचना आरोग्य विभागाने शनिवारी दिल्या.

Web Title: Instructions for working in coordination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.