भजनी दिंड्यांना ८० हजारांच्या वाद्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 04:19 PM2019-03-12T16:19:34+5:302019-03-12T16:19:54+5:30

शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शेलगाव खवणे येथे ५ मार्चपासून आयोजित भागवत कथा सप्ताहाचा समारोप १२ मार्च रोजी करण्यात आला.

instruments worth of 80 thousand presented | भजनी दिंड्यांना ८० हजारांच्या वाद्यांची भेट

भजनी दिंड्यांना ८० हजारांच्या वाद्यांची भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शेलगाव खवणे येथे ५ मार्चपासून आयोजित भागवत कथा सप्ताहाचा समारोप १२ मार्च रोजी करण्यात आला. या कार्यक्रमात भजनी दिंड्यांना विविध साहित्य भेट देण्याची परंपरा यंदाही राखण्यात आली आणि यावेळी  भजनी दिंड्यांना भजनासाठी ८० हजारांच्या वाद्यांची भेट देण्यात आली. यानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.
मालेगाव तालुक्यात शिरपूर जैन येथून तीन किलोमीटर अंतर असलेल्या शेलगाव खवणे येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही श्रीमद भागवत कथा व हरिनाम पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ५ मार्च पासून सुरुवात झाली.  यानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. भागवत कथेचे वाचन हभप केदारनाथ महाराज सरनाईक यांनी केले. या धार्मिक सोहळ्यात नामवंत किर्तनकाराची किर्तन सेवाही घडली. या धार्मिक सोहळ्याचा समारोप १२ मार्च रोजी करण्यात आला. यावेळी शेलगाव खवणे येथे परंपरेनुसार भागवत सप्ताहाच्या समारोपानिमित्त संस्थानचावतीने करंजी, शेलगाव ओंकारगीर, किन्ही घोडमोड, दुधाळा, वसारी, खंडाळा व वाघी येथील भजनी दिंड्यांना टाळ, विणा, मृदंग अशी विविध ८० हजारांची वाद्ये भेट म्हणून देण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. पंचक्रोशतील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी गावकºयांनी परिश्रम घेतले.

Web Title: instruments worth of 80 thousand presented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम