३५ महसूल मंडळातील संत्रा फळबागेला विम्याचे कवच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 04:35 PM2019-06-13T16:35:34+5:302019-06-13T16:36:02+5:30

वाशिम जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा, डाळिंब व लिंबू या फळपिकासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मध्ये २०१९-२० राबविण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे.

Insurance armor to 35 orange orchards in the revenue board | ३५ महसूल मंडळातील संत्रा फळबागेला विम्याचे कवच

३५ महसूल मंडळातील संत्रा फळबागेला विम्याचे कवच

Next

वाशिम - जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा, डाळिंब व लिंबू या फळपिकासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मध्ये २०१९-२० राबविण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे. मृगबहार संत्रा फळपिकाकरीता जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांचा समावेश असून, शेतक-यांना १४ जूनपर्यंत नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

 मृगबहार संत्रा फळपिकाकरीता वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डीआसरा व राजगाव, रिसोड तालुक्यातील रिसोड, केनवड, भरजहांगीर व रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस व मेडशी, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, शेलू खु., पोटी, कवठळ, धानोरा, शेलू बाजार व पार्डीताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली, उमरी बु. व कुपटा, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, कारंजा, कामरगाव, धनज बु. पोहा, खेर्डा बु., हिवरा लाहे व येवता या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी ७७ हजार रुपये असून शेतकºयांनी केवळ ३ हजार ८५० रुपये विमा हप्ता भरावयाचा असून उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. 

मृगबहार डाळिंब पिकासाठी वाशिम तालुक्यातील पार्डी आसरा, राजगाव व पार्डी टकमोर, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, आसेगाव, शेलूबाजार, कवठळ, धानोरा व पाडीर्ताड, मालेगाव तालुक्यातील मुंगळा, मानोरा तालुक्यातील उमरी बु. या ११ महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात डाळिंब या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी १ लक्ष २१ हजार रुपये असून शेतकºयांना केवळ ६ हजार ५० रुपये विमा हप्ता भरावा लागणार असून उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. 

लिंबू पिकासाठी वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे. लिंबू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ६६ हजार रुपये असून शेतकºयांनी भरावयाचा विमा हप्ता प्रतिहेक्टर ३३०० रुपये इतका आहे. 

या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना संत्रा व लिंबू पिकासाठी १४ जून २०१९ तर डाळिंब पिकासाठी १५ जुलै २०१९ पर्यंत विमा हप्ता भरून सहभागी होता येईल. विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी बँक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

Web Title: Insurance armor to 35 orange orchards in the revenue board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम