संक्रांतीच्या मुहूर्तावर इंटरसिटी आजपासून रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:34 AM2021-01-14T04:34:15+5:302021-01-14T04:34:15+5:30

गाडी संख्या ०७६४१ काचीगुडा-नरखेड ही रेल्वेगाडी १४ जानेवारीपासून, तर ०७६४२ नरखेड-काचीगुडा ही गाडी १५ जानेवारीपासून पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सहाही दिवस ...

Intercity on track from today on the eve of Sankranti | संक्रांतीच्या मुहूर्तावर इंटरसिटी आजपासून रुळावर

संक्रांतीच्या मुहूर्तावर इंटरसिटी आजपासून रुळावर

Next

गाडी संख्या ०७६४१ काचीगुडा-नरखेड ही रेल्वेगाडी १४ जानेवारीपासून, तर ०७६४२ नरखेड-काचीगुडा ही गाडी १५ जानेवारीपासून पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सहाही दिवस धावणार आहे. तसेच काचीगुडा-अकोला ही ०७६३९ क्रमांकाची साप्ताहिक एक्स्प्रेस १८ जानेवारीपासून दर सोमवारी काचीगुडा येथून सकाळी ७:१० वाजता सुटून निझामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड,पूर्णा, हिंगोली, वाशीममार्गे अकोला येथे सायंकाळी ६:३० वाजता पोहोचणार आहे. गाडी संख्या ०७६४० अकोला-काचीगुडा ही १९ जानेवारीपासून दर मंगळवारी अकोला येथून सकाळी ९:३० वाजता सुटेल आणि वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड़, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबादमार्गेे काचीगुडा येथे रात्री ८:१५ वाजता पोहोचेल. गाडी संख्या ०७६४१ काचीगुडा-नरखेड ही १४ जानेवारीपासून आठवड्यातून सहा दिवस सोमवार वगळता दररोज काचीगुडा येथून सकाळी ७:१० वाजता सुटून निझामाबाद, बासर, धर्माबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तिजापूर, न्यू अमरावतीमार्गे नरखेड येथे रात्री ११:१० वाजता पोहोचेल. एक्स्प्रेस रेल्वे आरक्षित असून या गाड्यांमध्ये अनारक्षित प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही, असे रेल्वे मंडळाने कळविले आहे.

Web Title: Intercity on track from today on the eve of Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.