उपकेंद्रावरील विज पुरवठा खंडीत
By admin | Published: June 12, 2017 07:37 PM2017-06-12T19:37:53+5:302017-06-12T19:37:53+5:30
तालुक्यातील पोहरादेवी येथील विज उपकं ेद्रावरील विद्युत पुरवठा अवेळ गुल होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील पोहरादेवी येथील विज उपकं ेद्रावरील विद्युत पुरवठा अवेळ गुल होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो अधिकार व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही तसेच मान्सुनपुर्व या भागात कामे सुध्दा करण्यात न आल्यामुळे विजेचा लपंडावात भर पडत आहे. त्यामुळे कर्तव्यात कसुर करुन कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याविरुध्द कारवाई करण्यात येईल.अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असे निवेदन पोहरादेवी येथील मोन्टी राठोड व गजानन खंडारे यांनी सहाय्यक अभियंता यांना दिले आहे.
गेल्या १० ते १५ दिवसापासून पोहरादेवी विद्युत उपक ेंद्रावरील विज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी गुल झालेली विजेचा सकाळीच दर्शन होते. त्यामुळे बालक व वयोवृध्द रुग्णांना संख्येत वाढ होत आहे. याठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्यासाठी शासनाच्यावतीने निवासस्थानाची इमारत उभी करण्यात आलेली आहे. परंतु त्यामध्ये कोणीच राहत नसल्याने निवासस्थान ओसाड पडले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिक वैतागले असून विद्युत लाईनमनने हाताखाली कर्मचारी म्हणून ठेवलेल्या खाजगी व्यक्तीकडून घरगुती कामे पैसे मोजुन करुन घेण्याची पाळी ग्राहकांवर आली आहे. मेन लाईनचे मुख्य तारचे काम मान्सुनपुर्व पावसाळ्याअगोदर करण्याची आवश्यकता आहे, पंरतु अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानीमुळे ते अद्यापही करण्यात आलेले नाही. त्यामुळे वरिष्ठांनी मुख्यालयी न राहणाऱ्या व कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.