शेगाव येथे विदर्भस्तरीय लिंगायत उपवधू-उपवर परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 03:11 PM2018-11-21T15:11:09+5:302018-11-21T15:11:20+5:30
वाशिम : विदर्भ वीरशैव समाज समतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही गजानन महाराज यांची पावनभुमी शेगाव येथे महाराष्ट्रातील लिंगायत उपवधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विदर्भ वीरशैव समाज समतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही गजानन महाराज यांची पावनभुमी शेगाव येथे महाराष्ट्रातील लिंगायत उपवधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामेळावा २४ व २५ नोव्हेंबर असा दोन दिवसीय असणार असून जिल्हयातून शेकडो जण या मेळाव्यास उपस्थिती दर्शविणार आहेत.
या उपवर-वधू महामेळाव्याचे उद्घाटन वीरशैव धर्मगुरू सिध्दलींग शिवाचार्य स्वामी साखरखेर्डा, शिवशंकर शिवाचार्य स्वामी नेरनिंगळाई, मरूळसिध्द शिवाचार्य महाराज कारंजा लाड, विररूद्र मुनी शिवाचार्य स्वामी पांढूर्णा यांच्या उपस्थित पार पडणार आहे. याप्रसंगी वीरशैव आमदार हरिश पिंपळे, आमदार राहुल बोंद्रे, नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे या मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती राहणार आहे. पहिल्या सत्रामध्ये अर्थात २४ नोव्हेंबरला उपवर-वधूंची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन राजेश कावळे, आयोजन समितीचे अध्यक्ष शिरीष रामापुरे, माजी खासदार अनंतराव गुढे, मनोहर कापसे यांच्या उपस्थित होणार आहे. त्यानंतर उपवर-पधू परिचय महामेळाव्यास प्रारंभ होईल.
२५ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजेपासून परिचय महामेळाव्याला पुन्हा सुरूवात होईल. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष शिरीष रामापुरे, प्रकाश मोतेवार, मनोहरआप्पा कापसे, काशिनाथ लाव्हरे, प्रा. सुरेश लोखंडे, बाळासाहेब हवा, किरण जिरवणकर, विश्वंभर महाजन, धनंजय कपाले, प्रा. तुकाराम बुकशेटवार यांच्यासह समाजातील मान्यवरांनी केले आहे.