त्वचारोग, कुष्ठरोग शोध अभियानाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 05:46 PM2018-09-24T17:46:09+5:302018-09-24T17:46:20+5:30
वाशिम: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री प्रगती योजनेतून त्वचारोग व कुष्ठरोग शोध अभियान २०१८ ला जिल्ह्यात सोमवार २४ सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री प्रगती योजनेतून त्वचारोग व कुष्ठरोग शोध अभियान २०१८ ला जिल्ह्यात सोमवार २४ सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात आला. मालेगाव तालुक्यातील राजाकिन्ही येथे जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती सुधीर गोळे यांचे हस्ते दिप प्रज्वलीत करुन व प.पु.महात्मा गांधी यांचे प्रतिमेस अभिवादन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर, जि.प. जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे उपस्थित होते. आरोग्य सेवा कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. दिपक शेलोकर यांनी कुष्ठरोगा विषयी सवीस्तर माहिती दिली. सदर अभियान २४ सप्टेंबर ते ९ ते आॅक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शहरातील झोपडपट्टी भाग व काही जास्त कुष्ठरुग्ण भार असलेल्या भागांचे सर्र्वेक्षण करण्यात येईल. शोधलेले कुष्ठरुग्ण बहुविध औषधोपचाराखाली आणून त्यांना रोगमुक्त, विनाविकृती बरे करणे, कुष्ठरोग जंतुचा प्रसार खंडीत करणे व कुष्ठरोग निर्मुलनाचे ध्येय साध्य करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. कुष्ठरोगाची संशयीत लक्षणे व निदानात्मक लक्षणाविषयी तसेच कुष्ठरोगास साधर्म्य असणाºया आजाराविषयी डॉ.शेलोकार यांनी माहिती दिली. सदर कार्यक्रमास जिल्हा कें द्रीय पथक, वैद्यकीय अधिकारी, डॉ.अश्विन कुमार हाके, किन्हीराजाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.काळे, मालेगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोरसे, अ. वै. पर्यवेक्षक एन.एन.बढे, ए.एस.लोणारे अ.वै.पर्यवेक्षक,जे.आर.ठाकरे उपस्थित होते.