कपाशी, सोयाबीनवर रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:22 PM2017-09-08T20:22:06+5:302017-09-08T20:22:28+5:30

सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  अशा आदि रोगांनी  आक्रमण केले आहे. तर सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची  भिती शेतकºयांमध्ये व्यक्त केली जात आहे.

Invasion of cottonseed, soya bean | कपाशी, सोयाबीनवर रोगाचे आक्रमण

कपाशी, सोयाबीनवर रोगाचे आक्रमण

Next
ठळक मुद्देसोयाबीनवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव कपाशीच्या उत्पादनावर परिणाम शेतक-यांमध्ये भिती 

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  अशा आदि रोगांनी  आक्रमण केले आहे. तर सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची  भिती शेतकºयांमध्ये व्यक्त केली जात आहे.
दरम्यान रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संबंधीत शेतकºयांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन होणे गरजेचे असतांना मात्र ते होत नसल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून होत आहे. या परिस्थितीत नेमके काय करावे, या संभ्रमात शेतकरी आहे. यावर्षी  हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.  मात्र हा अंदाज खोटा ठरवत पावसाने चांगलीच दडी मारली.  अधुनमधुन आलेल्या रिमझीम पावसाने पिकांना जीवनदान मिळाले. पिकाची वाढही बरी झाली. मात्र हवा तसा पाऊस न आल्याने जमीनीला भेगा पडल्या होत्या तसेच जमीनीतील तापमानातही मोठी वाढ झाली. 
परिणामी सध्या फळधारणेच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन व कपाशी या दोन्हीही पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. कपाशीवर रसशोधक किडी यांच्यासह आदि रोगांनी  आक्रमण केले आहे. त्यामुळे त्याची पाने सुकु लागली आहे. तर सोयाबीनच्या शेंगा अळ्या मोठ्या प्रमाणावर फस्त करत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनवर फळधारणेच्या काळात  शक्यतो अळ्यांच्या प्रादुर्भाव होत नाही. मात्र यंदा पहिल्यांदाच अशा स्थितीत अळ्याचे अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागाशी शेतकºयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ‘रिस्पॉन्स’ मिळाला नाही.

Web Title: Invasion of cottonseed, soya bean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.