कपाशीवर अज्ञात रोगाचे आक्रमण; शेतकरी हैराण
By Admin | Published: August 13, 2015 01:11 AM2015-08-13T01:11:20+5:302015-08-13T01:11:20+5:30
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज; वाढलेली झाडे चालली सुकत.
तळप बु. (जि. वाशिम) : परिसरातील शेतकर्यांच्या कपाशी पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केल्यामुळे कपाशीची वाढलेली झाडे सुकत चालली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होण्याचे संकेत असून यासंदर्भात कृषी विभागाने वेळीच लक्ष पुरवून शेतकर्यांना यथायोग्य मागदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परिसरातील मौजे कार्ली शेतशिवारातील शेतकरी देविदास पाटील यांच्या शेतातील कपाशीचे पिक अज्ञात रोगाच्या आक्रमणामुळे वाळत चालले आहे. यामुळे संपूर्ण कपाशीचे पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सदर शेतकरी हे अल्पभुधारक असून त्यांनी उत्न्हाळ्याच्या शेवटी त्यांच्या शेतात पारस, ब्रम्हा या वानाच्या कपाशी पिकाची लागवड केली. पिकाच्या संगोपनासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले. परंतु अज्ञात रोगाच्या आक्रमणामुळे त्यांना उत्पन्न तर सोडाच परंतु झालेला खर्चही निघणे अशक्य झाले आहे. तथापि, शेतकर्यांच्या मदतीसाठी गावस्तरावर कृषी सहाय्यकांची नेमणुक केलेली असते. मात्र, कृषी विभागाचे कर्मचारी गावात कधीकधीच हजेरी लावतात. त्यामुळे शेतकर्यांना त्यांच्याकडून कोणतेही मार्गदर्शन मिळू शकत नाही.परिणामी, पिकावर कोणत्या रोगाचे आक्रमण झाले आणि त्याचा बंदोबस्त कसा करावा, याबाबत कृषी विभागातील वरिष्ठांनी कार्ली येथे हजेरी लावून मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी देविदास पाटील यांनी केली आहे.